Diwali : रिक्षा चालकांची काळी दिवाळी व लाक्षणिक उपोषण

रिक्षा कर्जदारांना फायनान्स कंपन्या छळत आहेत. या विषयी आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यानुसार, आपत्कालीन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना काळामध्ये थकलेले हप्ते बांधून देण्यासाठी पुढाकार घ्यावा.

Diwali : रिक्षा चालकांची काळी दिवाळी व लाक्षणिक उपोषण

रिक्षा चालकांची काळी दिवाळी व लाक्षणिक उपोषण

पुणे : रिक्षा कर्जदारांना फायनान्स कंपन्या छळत आहेत. या विषयी आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यानुसार, आपत्कालीन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी करोना काळामध्ये थकलेले हप्ते बांधून देण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच फायनान्स कंपन्यांची कर्जे राष्ट्रीयकृत बँकांमध्ये वर्ग करावीत असे निवेदन रिक्षा पंचायतीने दिले होते.

निदर्शनेही करण्यात आली होती. त्यासाठी रिक्शाचालकांचे व्यक्तिगत अर्जही भरून देण्यात आले होते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आताही बऱ्याच जणांच्या गाड्या ओढून नेऊन नियमबाह्य विकल्या सुद्धा आहेत. रोजगाराचे साधन गेल्यामुळे फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतलेले रिक्षा चालक हवालदिल झाले आहेत. तसेच ज्यांच्याकडे कर्ज चालू असलेल्या रिक्षा आहेत त्यांच्यावर सतत प्रेशर येत आहे. फायनान्स कंपन्यांचे वसुली एजंट म्हणून जे काम करतात ते सर्व नियमधाब्यावर बसवून गुंडगिरी, शिवीगाळ, नियमबाह्य गाडी ओढून नेणे असे प्रकार करत आहेत.

सणासुदीच्या काळात तर या सर्वाला ऊत येत आहे. या सर्व कारणांमुळे रिक्षाचालकांना कसली दिवाळी आणि कसला दसरा म्हणून या अन्यायाबद्दल दाद मागण्यासाठी रिक्षा चालक प्रातिनिधिक स्वरूपात ऐन दिवाळीत गुरुवार ९ नोव्हेंबर २०२३ रोजी जिल्हाधिकारी कचेरी समोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करतील, असा इशारा देण्यात आला आहे.

रिक्षा चालक काळी दिवाळी पाळणार

रिक्षा परवाना खुला ठेवून, परवानामुक्त इ रिक्षासारखी वाहने आणत रिक्षा चालकांच्या भाकरीत रोज वाटेकरी निर्माण करण्याचे धोरण, रिक्षा चालक कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास लागलेला दीर्घ उशिर या विषयीही यावेळी निषेध केला जाईल.

रिक्षा भाड्याच्या दहा टक्के अधिक दिवाळी बोनस भाडे स्टिकरचे डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते प्रकाशन दरम्यान दिवाळीच्या काळात केलेल्या प्रवास मीटर भाड्याच्या दहा टक्के अधिक बोनस भाडे द्यावे, असे आवाहन रिक्षा पंचायतीने केले आहे. याबाबत प्रवाशांना आवाहन करणाऱ्या स्टिकरचे प्रकाशन पंचायतीचे अध्यक्ष जेष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्यांनी ड्रायव्हर सीटच्या मागील बॅकरेस्टवर स्वतः स्टिकर चिटकवून या उपक्रमात सुरुवात केली. हे स्टिकर निर्मिती खर्चात रिक्षा पंचायत कार्यालयात रिक्षा चालकांसाठी उपलब्ध आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest