Wagholi : वाघोलीत विद्यार्थ्याने गळफास घेऊन संपवले जीवन

वाघोलीत अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना (Wagholi) उघडकीस आली. आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. अजय विश्वनाथ पवळे (Ajay Vishwanath Pavle) (वय १६, रा. अनुसया पार्क, वाघोली) असे आत्महत्या केलेल्या (Pune News) विद्यार्थ्यांचे नाव आहे.

Wagholi : वाघोलीत विद्यार्थ्यानी गळफास घेऊन संपवले जीवन

वाघोलीत विद्यार्थ्यानी गळफास घेऊन संपवले जीवन

पुणे : वाघोलीत अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना (Wagholi) उघडकीस आली. आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. अजय विश्वनाथ पवळे (Ajay Vishwanath Pavle) (वय १६, रा. अनुसया पार्क, वाघोली) असे आत्महत्या केलेल्या (Pune News) विद्यार्थ्यांचे नाव आहे.

याप्रकरणी लोणीकंद पोलीस (Lonikand Police) ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. वाघोलीतील अनुसया पार्कमधये पवळे कुटुंब राहायला आहे. अजय एका महाविद्यालयात अकरावीत होता. सोमवारी दुपारी घरात कोणी नसताना अजयने गळफास घेऊन आत्महत्या केली. अजयची आई सायंकाळी कामावरुन परतल्यानंतर त्याने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला.

या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. त्याचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. अजयने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर कुटुंबीयांना धक्का बसला आहे. आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. लोणीकंद पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest