विजयस्तंभ अभिवादन सोहळा यशस्वी करण्यासाठी आवश्यक नियोजन करा - जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांतता आणि उत्साहात साजरा व्हावा तसेच येणाऱ्या अनुयायांना आवश्यक त्या सोयीसुविधा पुरवण्यासाठी सर्व विभागांनी आवश्यक नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.

संग्रहित छायाचित्र

पेरणे फाटा येथील विजयस्तंभास अभिवादन कार्यक्रमाच्या नियोजनाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

पुणे : पेरणे फाटा येथे १ जानेवारी रोजी आयोजित करण्यात येणारा विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांतता आणि उत्साहात साजरा व्हावा तसेच येणाऱ्या अनुयायांना आवश्यक त्या सोयीसुविधा पुरवण्यासाठी सर्व विभागांनी आवश्यक नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.

विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, बार्टीचे महासंचालक सुनील वारे , पोलीस सहआयुक्त रामनाथ पोकळेअपर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक अंकित गोयल आदी उपस्थित होते.

डॉ. देशमुख म्हणालेयावर्षी मोठ्या प्रमाणात अनुयायी येण्याची शक्यता असून त्यादृष्टीने सर्व बाबींचे सूक्ष्म नियोजन करावे. वाहतूक व्यवस्था, वाहनतळाचा आराखडा बारकाईने तयार करावा, त्यासाठीच्या जागा निश्चित कराव्यात. स्वच्छतेसाठी पथकांची नियुक्ती आणि तात्पुरत्या स्वच्छतागृहांसाठी पुरेशा प्रमाणात पाण्याची सुविधा करावी. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची संख्या वाढवावी.

पोलीस विभागाने वाहतूकीचे नियोजन करण्यासह कायदा व सुव्यवस्थेबाबत नियोजन करावे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिलहा परिषद बांधकाम विभागाने रस्त्यांची डागडुजी करून घ्यावी. पीएमपीएमएलने ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीसाठी बसेसची संख्या वाढवावी आणि वाहनात इंधन भरण्याचीही पुरेशी व्यवस्था करावी. गतवर्षीच्या तुलनेत वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, आवश्यकता असल्यास बाहेरून मनुष्यबळ मागवावे. रुग्णवाहिकांची संख्यादेखील वाढवावी अशाही सूचना श्री. देशमुख यांनी दिल्या.

वारे म्हणाले, या कार्यक्रमासाठी सर्व विभागांनी आपली मागणी तात्काळ बार्टीकडे द्यावी. यावेळी विजयस्तंभ परिसराचे सुशोभिकरण, प्रकाशव्यवस्था, स्टॉल, मंडप उभारणी, वाहनतळ, वाहतूक आराखडा, आरोग्य सुविधा, पिण्याचे पाणी, रस्त्यांची दुरुस्ती, तात्पुरते शौचालय उभारणी, स्वच्छतेसाठी घंटागाड्या, आपत्तकालीन प्रसंगी अग्नीशमन वाहनांची व्यवस्था, विद्युत व्यवस्था, हिरकणी कक्ष, आपत्ती व्यवस्थापन  आदींबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीस पोलीस उपायुक्त विजय मगर, ए.राजा, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदमउपविभागीय अधिकारी स्नेहा किसवेसंजय आसवले, यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे महानगरपालिका, पीएमआरडीए अग्नीशमन विभाग, एनडीआरएफ, जिल्हा परिषद, पोलीस विभाग, परिवहन, पीएमपीएमएल, आरोग्य विभाग, राज्य उत्पादन शुल्क आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest