Ajit Pawar : अजित पवारांना राजकीय डेंगू ! मराठा समाजाची टिका

मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) आंदोलन करणारे कार्यकर्ते उपमुख्यमंत्री अजित पवारांवर (Ajit Pawar) नाराज आहेत. दरम्यान, अजित पवारांना डेंग्यू झाल्याची बातमी आल्यानंतर देखील मराठा समाजाकडून टीका होत आहे. अजित पवारांना राजकीय डेंग्यू (Dengue) झाल्याचेही आरोप होत आहेत.

 Ajit Pawar : अजित पवारांना राजकीय डेंगू ! मराठा समाजाची टिका

अजित पवारांना राजकीय डेंगू ! मराठा समाजाची टिका

अजित पवारांविरोधातील आंदोलन रद्द केले !

पुणे : मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) आंदोलन करणारे कार्यकर्ते उपमुख्यमंत्री अजित पवारांवर (Ajit Pawar) नाराज आहेत. दरम्यान, अजित पवारांना डेंग्यू झाल्याची बातमी आल्यानंतर देखील मराठा समाजाकडून टीका होत आहे. अजित पवारांना राजकीय डेंग्यू (Dengue) झाल्याचेही आरोप होत आहेत.

अजित पवार गेल्या काही दिवसांपासून घराबाहेर बाहेर पडलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाने अजित पवारांविरोधातील दौंड आणि बारामती येथील आंदोलन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

अजित पवार यांच्या हस्ते आज दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ होणार होता. या समारंभास दौंड शहर व तालुका सकल मराठा समाजाने विरोध दर्शविला होता. परंतू, अजित पवारांची प्रकृती बरी नसल्याने आंदोलन रद्द करण्याचा निर्णय घेण्य़ात आला आहे. आता अजित पवारांऐवजी गळीत हंगामाचा शुभारंभ सुनेत्रा पवार यांच्या हस्ते होणार असल्याचे सांगितले जात आहे.

अजित पवार यांच्या हस्ते बारातमतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ६७ व्या गळीत हंगाम शुभारंभाच्या जंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तिथेही याबाबत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष केशवराव जगताप यांना निवेदन देण्यात आले होते. या वर्षीचा गळीत हंगाम कोणत्याही राजकीय व्यक्तींच्या हस्ते करू नये. राजकीय व्यक्तींच्या हस्ते गळीत हंगाम सुरू करण्याचा घाट घातल्यास कारखान्यावर बहुसंख्येने येऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला होता. परंतू, तिथेही अजित पवार गेले नव्हते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest