संग्रहित छायाचित्र
विद्यापीठ अनुदान आयोग (University Grants Commission) म्हणजेच यूजीसीने (UGC) एक महत्त्वपूर्ण अधिसूचना जाहीर केली आहे. या अधिसूचनेनुसार २०२३-२४ या पुढील सत्रापासून एम. फिल. अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुढील शैक्षणिक सत्रापासून या अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जाणार नाही. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) २७ डिसेंबर रोजी देशातील विद्यापीठांना पुढील सत्रापासून एमफिल अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणे थांबविण्याचे निर्देश दिले. एम. फिल. ही आता मान्यताप्राप्त पदवी नसल्यामुळे महाविद्यालयीन एम. फिल. डिग्री आता कायमची बंद होणार आहे. या धर्तीवर देशभरातील सर्व महाविद्यालयांना या डिग्रीचे प्रवेश न देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे 'मास्टर ऑफ फिलॉसॉफी' ही डिग्री आता कायमची बंद होणार आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव मनीष जोशी यांनी विद्यार्थ्यांना एम. फिल.साठी प्रवेश न घेण्याचे आवाहन केले आहे. यूजीसीकडून याबाबतचा अधिकृत आदेश काढण्यात आला आहे. काही महाविद्यालयांनी एम. फिल. प्रवेशासाठी जाहिराती दिल्या आहेत. मात्र, ही डिग्री मान्यताप्राप्त नसल्यामुळे महाविद्यालयांनीही या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देऊ नयेत, असे यूजीसीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या पदवीला रद्द करण्याची शिफारस राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये करण्यात आली होती.
मनीष जोशी म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये ही पदवी बंद करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर आजपासून स्पष्ट नोटीस देऊन ही पदवी रद्द करण्यात आली. महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश न घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. २०२२ मध्ये ही पदवी नोव्हेंबरमध्येच बंद करण्यात आली होती.
हा एक दुर्दैवी निर्णय आहे. कारण पीएच.डी. साठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना तत्त्वज्ञान, संशोधनाची मूलभूत संकल्पना मास्टर ऑफ फिलॉसॉफी (एम.फिल.) उपयुक्त ठरत होती. पुढील संशोधन आणि विकासासाठी ही एक आश्वासक पदवी होती.
-प्रा. राहुल जोशी
एम. फिल.बाबत यूजीसीच्या निर्णयाचे मी स्वागत करते. प्रवेशासाठी पीईटी परीक्षा ही पूर्वअट आहे. पीईटी परीक्षेत दोन भाग असतात, सामान्य अभियोग्यता आणि विषय-विशिष्ट अभियोग्यता चाचण्या. आता पीईटीद्वारे सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश होऊ शकतील.
- साक्षी सोनवणे, संशोधक, विद्यार्थी
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.