पुण्यात एनआयएची छापेमारी !
पुणे : (Pune) गुलटेकडी परिसरात बेंगलोरच्या राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात नॅशनल इन्व्हेस्टिंग एजन्सी (National Investing Agency) (एनआयए) (NIA) च्या पथकाने आज (सोमवारी) सकाळी छापेमारी केली आहे. पुण्यातून एनआयने १९ वर्षीय साफवान शेख (Safwan Sheikh) या विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं आहे. एनआयएकडून त्याची चौकशी सुरु आहे. पुलगेटच्या अरिहंत कॉलेजचा हा विद्यार्थी आहे. त्याच्याकडून मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस जप्त करण्यात आले आहेत. साफवान बंगळुरुमधील इसिस मॉड्यूलच्या टेलिग्राम गृपमध्ये सहभागी असल्याने चौकशी सुरु आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने पुणे आणि अमरावती येथून दोन तरुणांना ताब्यात घेतलं आहे. अमरावतीच्या अचलपूर शहरमध्ये मध्यरात्री NIAने छापेमारी केली.
आयएसआयएस मॉडेलच्या सदस्यांचा एक टेलिग्राम ग्रुप असून या ग्रुपमध्ये तब्बल 2000 पेक्षा अधिक जण सदस्य असल्याची माहिती समोर येत आहे. टेलिग्राम ग्रुपचा सदस्य असलेला साफवन शेख हा त्या ग्रुपवरील माहिती डाऊनलोड करत होता, आणि या सगळ्या माहिती मधून तो आयएसआयएस मध्ये सहभागी असल्याची माहिती एनआयएला मिळाली होती आणि या सगळ्या माहितीवरून आज सकाळी बेंगलोरच्या पथकाने पुण्यातील गुलटेकडी परिसरात छापेमारी करत शेख याला ताब्यात घेतलं आहे.
एनआएच्या कर्नाटकातील बेंगलोरमधील पथकाने ही कारवाई केली आहे. छाप्यात एनआयए ने संशयास्पद वस्तू जप्त केल्या आहेत. गेल्या आठवड्यात मुंबई पुणे आणि राज्यभरात एनआयएच्एनआयएच्या छापेमारीनंतर आज पुण्यात मोठी छापेमारी सुरू आहे. पुण्यातील कोथरुड भागात 18 मे रोजी दोन अतिरेक्यांना अटक केली होती. गेल्या आठवड्यात 15 संशयितांना ठाणे जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आलं होतं.
अमरावतीतूनही एक विद्यार्थी ताब्यात
अमरावतीमध्येही एनआयएने मोठी कारवाई केली आहे. एका शिक्षकाच्या मुलाला एनआयने ताब्यात घेतलं आहे. विद्यार्थी दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेला असावा असा संशय एनआयए ला आहे. सध्या अमरावती येथील जोग क्रीडा संकुल पोलीस मुख्यालयामध्ये त्याची कसून चौकशी सुरू आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.