'कोव्हिड बॅच'? 'निकाला'त
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. यंदाच्या निकालात राज्यातील ७ हजार ६९६ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले. ३५ ते ४५ टक्के गुण १ लाख ६७ हजार ७६३ विद्यार्थ्यांना मिळाले आहेत. गेल्या वर्षी १० हजार ३७ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले होते.