Deadly July! : जीवघेणा जुलै !

रायगड जिल्ह्यात खालापूरच्या इर्शाळवाडी येथे बुधवारी (१९ जुलै) रात्री दरड कोसळल्याने ३० कुटुंबे ढिगाऱ्याखाली अडकली. या घटनेत १३ पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. गावातील १०० ते १५० लोक या ढिगाऱ्याखाली अडकल्याचा अंदाज सुरुवातीला बचाव पथक आणि पोलिसांनी व्यक्त केला होता. त्यापैकी १०३ लोकांना मातीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vijay Chavan
  • Thu, 20 Jul 2023
  • 10:57 pm
जीवघेणा जुलै !

जीवघेणा जुलै !

जुलै महिना सह्याद्रीच्या रांगांत दुर्दैवी काळ घेऊन आला. आधी माळीण, तळीये आणि आता इर्शाळवाडी. सह्याद्रीचा कडाच मातीसह ढासळल्याने शेकडो लोकांचा जीव गेला. जुलै महिना या तिन्ही गावांसाठी काळ बनून आला.

विजय चव्हाण

vijay.chavan@civicmirror.in

TWEET@vijayCmirror

रायगड जिल्ह्यात खालापूरच्या इर्शाळवाडी येथे बुधवारी (१९ जुलै) रात्री दरड कोसळल्याने  ३० कुटुंबे ढिगाऱ्याखाली अडकली.  या घटनेत १३   पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला.  गावातील १०० ते १५० लोक या ढिगाऱ्याखाली अडकल्याचा अंदाज सुरुवातीला बचाव पथक आणि पोलिसांनी व्यक्त केला होता. त्यापैकी १०३ लोकांना मातीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आले.

जुलै महिना सह्याद्रीच्या रांगात  दुर्दैवी काळ घेऊन आल्याचे दिसते. संपूर्ण महिन्यात देशाला हादरवून सोडणाऱ्या तीन घटना घडल्या आहेत. आधी माळीण, तळीये आणि आता इर्शाळवाडी. निसर्गाच्या कोपाने या तिन्ही ठिकाणी सह्याद्रीचा  कडाच मातीसह ढासळल्याने  शेकडो लोकांचा जीव गेला. वरील तिन्ही घटना जुलै महिन्यातच घडल्या होत्या. जुलै महिना या तिन्ही गावांसाठी काळ बनून आला होता.

इर्शाळवाडी -१९ जुलै २०२३: (आत्तापर्यंत एकूण मृत्यू -१३)

राज्यात झालेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळवाडी दुर्घटनेत मृतांचा आकडा १३ वर पोहोचला असून या दुर्घटनेत आतापर्यंत ५७ जणांना वाचवण्यात यश आलं असल्याची माहिती आहे. दरम्यान, बेपत्ता लोकांचा शोध घेतला जात आहे. रात्रीच्या अंधारात डोंगराच्या दरडीखाली हे गाव दबले गेल्याने अनेकांना काही कळण्याआधीच दुर्दैवाने मृत्यूने गाठलं. यामध्ये मृतांच्या नावांची यादी समोर आली असून १३ जणांनी आपला जीव गमावला आहे तर ६ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अत्यंत दुर्गम अशा ठिकाणी ही वाडी वसलेली असल्याने आणि मदतीसाठी कोणतीही साधने इथे आणणं शक्य नसल्याने फक्त माणसांच्या मदतीने इथे मदत पोहोचवता येणे शक्य झाले. स्थानिक नागरिक, एनडीआरएफ, एसडीआरएफ, टीडीआरएफ यांच्या पथकांच्या माध्यमातून याठिकाणी प्रत्यक्ष बचावकार्य सुरू आहे.

तळीये -२२ जुलै  २०२१ (एकूण मृत्यू – ८१)

२२ जुलैला तळीये गावातील काही भाग दुपारी १२ च्या सुमारास पहिल्यांदा डोंगराचा काही भाग खचला.  दरड कोसळली तेव्हा डोंगरात साठलेले पाणी खाली आले सोबत माती त्यामुळे भरपूर चिखल झाला. ग्रामस्थांना ३ ते ४ तास आधी दरड कोसळण्याचे संकेत मिळाले होते पण राहते घर सोडणे सोपे नसल्याने अनेकांनी तिथेच राहणे पसंत केले. परिणामी दरडीच्या ढिगाऱ्याखाली अनेक मृतदेह जेसीबीच्या साह्याने बाहेर काढावे लागले. मृतदेहांची विटंबना होत असल्याने आणि  स्वतःच्याच नातेवाईकांचे अवयव बाहेर येताना बघणे नको यामुळे गावकऱ्यांनी विनंती केली की शोध मोहीम थांबवा, त्यानंतर ही शोध मोहीम थांबवली गेली. उरलेले ३१  मृतदेह हे कधीच ढिगाऱ्याबाहेर आले नाहीत. दरड दुर्घटनेतून फक्त ५ लोक वाचले.

वरंध- बिरवाडी- महाड रस्त्यावर ढालकाठी फाट्याजवळ पुराच्या पाण्याने आणि माती रस्त्यावर आल्याने रस्ता झाला बंद त्यामुळे गुरुवारी संध्याकाळी तळीये दुर्घटनेची माहिती महाड परिसरात पोहचून सुद्धा महाडवरून मदत येऊ शकली नाही.  

माळीण ३० जुलै २०१४ : (एकूण मृत्यू –१५१)

आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर कोसळलेल्या दरडीच्या बातमीने संपूर्ण देशच हादरला. धो धो कोसळणारा पाऊस थांबण्याची वाट बघत बसणारे गाव कधी डोंगरावरून आलेल्या चिखलाखाली गाडले गेले हे कळलेसुद्धा नाही. ३० जुलै २०१४ ला डिंभे धरणाच्या पर्जन्यमापकात १०८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.  ३० तारखेच्या पहाटे प्रमाण एकाएकी वाढून १०३ मिलीमीटर झाले आणि संपूर्ण गाव डोंगरावरून कोसळणाऱ्या आक्रमक चिखलाखाली गाडले गेले.

एकूण ४४ उंबऱ्याचे अख्खे माळीण गावच 'धडाम' असा आवाज येत धरणीच्या कुशीत सामावले गेले. या भीषण दुर्घटनेत एकूण १५१ जणांचा झोपेतच मृत्यू झाला होता. त्यात महिला, पुरुष आणि त्यांची कच्चीबच्ची मिळून या गावाची लोकसंख्या १७५ इतकी होती.

दरम्यान, "दरडग्रस्त यादीत हे गाव नव्हते.  दरडग्रस्त गावातील लोकांना आपण स्थलांतरित करतो. पण हे गाव नसल्याने आपण येथील लोकांना स्थलांतरित केलेले नव्हते. हे गाव त्या यादीत का नव्हते, कुणाची चूक या सर्व गोष्टीची नंतर चौकशी होईलच. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत देऊ" असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story