Ajit Pawar : आम्ही दोघेही एकच

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी काही दिवसांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे पक्ष आणि चिन्हावर दावा सांगितला होता. यानंतर निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला उत्तर देण्यास सांगितले होते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vijay Chavan
  • Tue, 8 Aug 2023
  • 11:47 am
आम्ही दोघेही एकच

आम्ही दोघेही एकच

राष्ट्रवादीत दोन गट असल्याचा पुरावा नाही, शरद पवार गटाचे आयोगाला उत्तर

विजय चव्हाण

vijay.chavan@civicmirror.in

TWEET@vijayCmirror

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी काही दिवसांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे पक्ष आणि चिन्हावर दावा सांगितला होता. यानंतर निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला उत्तर देण्यास सांगितले होते. यावर अजित पवार गटाने राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावर केलेला दावा फेटाळण्याची विनंती शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे. यावर शरद पवार गटाने, 'त्यांनी केलेली मागणी ‘दुर्भावनापूर्ण’ आहे. त्यांच्याकडे राष्ट्रवादीमध्ये दोन गट असल्याचा कोणताही पुरावा नाही', असे म्हटले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाप्रमाणेच अजित पवार गटानेही खरी राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचीच असल्याचा दावा केला. कारण त्यांना पक्षाच्या बहुतांश आमदारांचा पाठिंबा आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील गटाने पक्षाचे नाव आणि चिन्हाचा दावा करत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगाला सांगण्यात आले की, अजित पवार यांची ३० जून २०२३ च्या ठरावाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यावर पक्षाच्या सदस्यांचे बहुमत असल्याची स्वाक्षरी आहे.

शरद पवार गटाच्या याचिकेत सांगण्यात आले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणताही वाद असल्याचे अजित पवार प्रथमदर्शनी दाखवू शकले नाहीत. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार गट यांच्यात कोणताही वाद आहे हे देखील निवडणूक आयोगाने प्रथमदर्शनी मान्य केले नाही. १ जुलैपूर्वी, अजित पवार यांनी शरद पवार/राष्ट्रवादी कॉंग्रेस विरोधात कोणतीही तक्रार केली नाही किंवा त्यांनी शरद पवार किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या इतर कोणत्याही नेत्याला बैठकीची विनंती केली नाही.

दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेप्रमाणे अजित पवार यांच्याकडून राष्ट्रवादीवर दावा सांगितला जात आहे. कारण पक्षातील बहुतांश आमदार अजित पवारांच्या गटात आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वातील गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह द्यावे यासाठी अजित पवार गटाने निवडणूक आयोगाला पत्र पाठवले होते.

अजित पवार गटाने ३० जून रोजी निवडणूक आयोगाला पत्राद्वारे सांगितले होते की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी स्वाक्षरी केलेल्या ठरावाद्वारे पक्षप्रमुखपदी आपली निवड करण्यात आली आहे. प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून कायम राहतील. या प्रकरणाची दखल घेताना निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नोटीस पाठवली आहे. पक्षाचा खरा अध्यक्ष असल्याच्या दाव्यावर अजित पवार गटाकडून नोटिशीद्वारे उत्तर मागवण्यात आले आहे. खरी राष्ट्रवादी कोणासोबत राहणार, हे निवडणूक आयोगाला ठरवायचे आहे. शरद पवार गटाच्या उत्तरानंतर निवडणूक आयोग निर्णय देणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story