अतिरिक्त आयुक्त अनिल रामोड यांचे घर आणि कार्यालयावर सीबीआयचा छापा, आढळली तीन ते चार कोटींची बेनामी रोकड

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पुण्यातील महसूल विभागातील आयएएस अधिकारी आणि अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल गणपतराव रामोड यांना भूसंपादनाच्या प्रकरणात लाच घेताना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या घरी आणि कार्यालयात कोट्यवधींची रोख रक्कम आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vijay Chavan
  • Sat, 10 Jun 2023
  • 12:18 am
अतिरिक्त आयुक्त अनिल रामोड यांचे घर आणि कार्यालयावर सीबीआयचा छापा, आढळली तीन ते चार कोटींची बेनामी रोकड

अतिरिक्त आयुक्त अनिल रामोड यांचे घर आणि कार्यालयावर सीबीआयचा छापा, आढळली तीन ते चार कोटींची बेनामी रोकड

डॉ. अनिल रामोड यांचे घर आणि कार्यालयावर सीबीआयचा छापा; आढळली तीन ते चार कोटींची बेनामी रोकड

विजय चव्हाण

vijay.chavan@civicmirror.in

TWEET@vijayCmirror

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पुण्यातील महसूल विभागातील आयएएस अधिकारी आणि अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल गणपतराव रामोड यांना भूसंपादनाच्या प्रकरणात लाच घेताना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या घरी आणि कार्यालयात कोट्यवधींची रोख रक्कम आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

आठ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. एका आयएएस उच्चपदस्थ अधिकाऱ्यावर झालेल्या या कारवाईमुळे महसूल विभाग हादरला आहे. एका वकील तक्रारदाराने अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. रामोड यांनी माळशिरस येथील महामार्गालगतच्या भूसंपादन प्रकरणात लाच मागितल्याप्रकरणी सीबीआयकडे तक्रार केली होती. त्यानुसार सीबीआयने शुक्रवारी (दि. ९) सकाळी संबंधित वकिलाकडून आठ लाख रुपये घेताना डॉ. रामोड यांना ताब्यात घेतले.

या नोटांवरील बोटांचे ठसे घेण्यात आले आहेत. डॉ. रामोड यांच्या नांदेड येथील घरीही सीबीआयकडून छापेमारी सुरू आहे. सीबीआय अधिकाऱ्यांकडून विभागीय आयुक्त कार्यालयात रामोड यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. सीबीआयचे वरिष्ठ अधिकारी सुधीर हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई सुरू आहे. डॉ. रामोड यांचा २०२० मध्ये आयएएस केडरमध्ये समावेश झाला होता.

बाणेर येथील ऋतुपर्ण सोसायटीत सी विंगमध्ये चौथ्या मजल्यावर डॉ. रामोड यांची सदनिका आहे. सीबीआयचे अधिकारी हे दुपारी दीडच्या सुमारास या सोसायटीत पोहोचले. त्यानंतर पुन्हा दहा मिनिटांनी दोन गाड्यांमधून सीबीआय अधिकारी-कर्मचारी दाखल झाले. त्यांनी या सदनिकेचा ताबा घेतला. या सदनिकेत अधिकाऱ्यांना मोठे घबाड सापडल्याची चर्चा आहे. त्यासाठी नोटा मोजण्याच्या दोन मशीन मागविण्यात आल्या असून पैशांची मोजदाद सुरू आहे.

क्वीन्स गार्डन येथील सरकारी निवासस्थान आणि बाणेर येथील ‘ऋतुपर्ण’ सोसायटी या खासगी निवासस्थानी सीबीआयकडून छापे टाकण्यात आले. या ठिकाणी तीन ते चार कोटी रुपयांची रक्कम आढळली असून, पैसे मोजण्याची मशिनच पोलीस अधिकाऱ्यांनी मागविली आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest