दर्शना खून प्रकरणातील संशयिताच्या घराला कुलूप
विजय चव्हाण
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करून अधिकारी झालेली तरुणी दर्शना पवार हिच्या मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण लागलं आहे.
दर्शनाचा मित्र राहुल हांडोरेवर पोलिसांचा संशय आहे. घटनेनंतर तो फरार झाला असून पोलिसांचे तपास पथक थेट नाशिक जिल्ह्यातील शाह गावात पोहचलं असता त्याचे कुटुंबीय एका आठवड्यापासून बरहेर निघून गेल्याचे समोर आले आहे.
डोक्यात आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्याने तिचा मृत्यू झाल्याची माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे. या प्रकरणात दर्शनाचा मित्र राहुल हांडोरेवर पोलिसांचा संशय आहे. घटनेनंतर तो फरार झाला आहे. राहुल हांडोरे याचा तपास घेत पोलिसांचं पथक थेट नाशिक जिल्ह्यातील शहा गावात पोहचलं. परंतु राहुलच्या घराला कुलूप आहे. गेल्या आठवड्यापासून त्याचे कुटुंबीय गावात नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. पोलीस राहुलचा शोध घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
राहुल हांडोरे हा मूळचा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील शाह गावाचा आहे. त्याने बीएससीचं शिक्षण पूर्ण केलं असून तो पुण्यात एमपीएससीची तयारी करत होता. दर्शना आणि राहुल यांची ओळख पुण्यातच झाली होती. मागील काही महिन्यांपासून दर्शना आणि राहुल एकमेकांच्या संपर्कात होते. ९ जून रोजी दोघे ट्रेकिंगला गेले असता ही घटना घडली. मात्र दोन ते तीन दिवस संपर्क न झाल्याने अखेल राहुलच्या कुटुंबियांनी १२ जूनला पोलिसांत तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.
राहुलचे वडील पेपर विक्रेते आहेत तर आई गृहिणी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राहुल बाहेरगावी शिकत होता त्यामुळे गावातील लोकांना त्याच्याबाबत माहिती नाही. राहुलचा फोन बंद असून दुसऱ्या राज्यात त्याचं लोकेशन आढळलं आहे. त्याने फोन सुरु केल्यावर तो कोणत्या भागात आहे, हे स्पष्ट होईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
दर्शनाने घरी आणि मैत्रिणीला राजगडावर जात असल्याची माहिती दिली हांती. काही तासांनंतर घरच्यांनी तिच्याशी संपर्क साधला परंतु तिचा फोन बंद लागला. घरच्यांनी तिच्या फोनची वाट पहिली. मात्र अनेक तास उलटून गेल्यावरही तिचा फोन न लागल्यामुळे सिंहगड पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. राहुलचाही फोन न लागल्यामुळे त्यांच्याही कुटुंबीयांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.