Pune Metro : मेट्रोचे दुसऱ्यांदा लोकार्पण, तेही अपुरेच!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते मेट्रोच्या विस्तारित मार्गाचे मंगळवारी लोकार्पण झाले. या आधीही ६ मार्च २०२२ ला त्यांनीच लोकार्पण केलेल्या वनाज ते रामवाडी या मार्गानंतर मागील वर्षभरात मेट्रो एक इंचही पुढे गेली नाही. आताही रुबी हॉल ते रामवाडी हा उन्नत मार्ग व स्वारगेट ते जिल्हा न्यायालय हा भुयारी मार्ग बंदच राहणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vijay Chavan
  • Wed, 2 Aug 2023
  • 10:54 am
मेट्रोचे दुसऱ्यांदा लोकार्पण, तेही अपुरेच!

मेट्रोचे दुसऱ्यांदा लोकार्पण, तेही अपुरेच!

पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केल्यानंतरही मेट्रोची धाव रुबी हॉलपर्यंतच, रुबी हॉल ते रामवाडी मार्ग बंदच

विजय चव्हाण

vijay.chavan@civicmirror.in

TWEET@vijayCmirror

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते मेट्रोच्या विस्तारित मार्गाचे मंगळवारी लोकार्पण झाले. या आधीही   ६ मार्च २०२२ ला त्यांनीच लोकार्पण केलेल्या वनाज ते रामवाडी या मार्गानंतर मागील वर्षभरात मेट्रो एक इंचही पुढे गेली नाही. आताही रुबी हॉल ते रामवाडी हा उन्नत मार्ग व स्वारगेट ते जिल्हा न्यायालय हा भुयारी मार्ग बंदच राहणार आहे.

वनाज ते रुबी हॉल व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट हे दोन्ही मार्ग जिल्हा न्यायालय स्थानकात एकत्र येतात. पिंपरी-चिंचवडपासून शिवाजीनगरपर्यंत उन्नत असलेला मार्ग शिवाजीनगरपासून स्वारगेटपर्यंत भुयारी आहे. यात पंतप्रधान मोदी यांनी लोकार्पण केल्यानंतर लगेचच वनाज ते रुबी हॉल व पिंपरी-चिंचवड ते जिल्हा न्यायालय  हे मार्ग मंगळवारपासूनच व्यावसायिक तत्त्वावर सुरू झाले असल्याचे महामेट्रोने कळवले आहे. या दोन्ही मार्गांवरील तिकिटांमध्ये दर शनिवार, रविवार ३० टक्के सवलत दिली जाईल. पदवीपर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज ३० टक्के सवलत आहे. वनाज ते रुबी हॉल तिकीट ३० रुपये असेल.  पिंपरी-चिंचवड ते न्यायालय स्टेशन तिकीट ३० रुपये असणार आहे. वनाज ते पिंपरी-चिंचवड ३५ रुपये, रुबी हॉल ते पिंपरी-चिंचवड ३० रुपये, पिंपरी-चिंचवड ते पुणे स्टेशन ३० रुपये असे तिकीट दर असतील. येत्या काही दिवसांत मेट्रो कार्ड वितरित करण्यात येणार आहे. त्यावरही १० टक्के सवलत राहणार आहे.

१ ऑगस्टला लोकार्पणानंतर लगेचच मेट्रो सुरू होईल. २ ऑगस्टला सकाळी ७ ते रात्री १० पर्यंत दर १० मिनिटांनी या मार्गावरून मेट्रो धावणार आहे. पिंपरी-चिंचवड ते पुणे या प्रवासाला २२ मिनिटे लागतील. महामेट्रोने या मार्गावर धावण्यासाठी ३ डब्यांच्या १८ गाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत. वनाजला पिंपरी-चिंचवडहून जायचे असेल तर न्यायालय स्थानकात मेट्रो बदलावी लागेल. तोच प्रकार वनाजहून पिंपरी-चिंचवडला जाणाऱ्या प्रवाशांना करावा लागेल.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story