बॉडी शेमिंग... वजनावरून ट्रोल करणाऱ्यांची केतकिने घेतली शाळा; पोस्ट व्हायरल
सोशल मीडिया वरती कलाकारांना ट्रोल केलं जाणं हे सध्या सुरू आहे.अश्यातच मराठी सिनेसृष्टीतली गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावरला बॉडी शेमिंगला सामोरं जावं लागलं.केतकीच्या फोटो आणि व्हिडिओंच्या खाली कमेंट करत तिला बॉडी शेम करण्यात येत आहे. सतत तिच्या पोस्टखाली तिच्या वजनावरून कमेंट करत तिला ट्रोल केलं जात आहे. यावर कधीही न बोलणारी केतकी आता मात्र व्यक्त झाली आहे.