पठाणच्या दिग्दर्शकांनी शाहरुख खान आणि राजू हिरानी यांना काय दिल्या शुभेच्छा!
दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी अभिनेता शाहरुख खान आणि सहकारी राजकुमार हिरानी यांना त्यांचा आगामी " डंकी" साठी खास शुभेच्छा दिल्या आहेत. सिद्धार्थने यापूर्वी शाहरुख खानसोबत 2023 च्या ब्लॉकबस्टर पठाणमध्ये काम केल असून पठाणने १०० कोटींपेक्षा जास्त कमाई करून बॉक्स ऑफिस रेकॉर्ड तोडत ब्लॉकबस्टर हीट ठरला जगभरात 1,050 कोटी कमवून त्याने अनोखा रेकॉर्ड केला आहे.
दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी ट्विटर वर आपल्या भावना शेयर करत म्हटलं “फक्त एकदाच असा चित्रपट येतो ज्यामध्ये उस्ताद एकत्र येतात जे त्यांच्या अनोख्या कलाकृती ने प्रेक्षकांची मन जिंकून घेतात. @iamsrk आणि राजू हिराणी सर यांच्या चित्रपटाची मी खूप आतुरतेने वाट पाहत आहे.मी उद्या चित्रपटगृहात हसायला , रडायला आणि या चित्रपटाचा अनुभव घ्यायला तयार आहे "
या शुभेच्छा खरच खास आहेत कारण शाहरुख खानचा २०२३ मधला हा तिसरा चित्रपट येणार असून संपूर्ण भारतीय चित्रपट इंडस्ट्री या साठी सज्ज आहे. आज प्रेक्षकांची प्रतीक्षा संपलेली आहे आणि शाहरुख खानचा 'डंकी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. आज प्रेक्षकांकडूनच समजेल की नक्की चित्रपट कसा आहे? आणि चित्रपटाने प्रेक्षकांच कितपत मनोरंजन केलेला आहे. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदी यांनी शाहरुखला दिलेल्या शुभेच्छा आणि ज्याप्रमाणे ते म्हणाले आहेत की हसायला आणि रडण्यासाठी मी हा चित्रपट बघणार आहे. ते आज चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.