संग्रहित छायाचित्र
'सीआयडी' या मालिकेत 'फ्रेड्रिक्स'ची भूमिका साकारणारे अभिनेते दिनेश फडणीस यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, त्यांची ही झुंज अपयशी ठरली. वयाच्या 57व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मल्टीपल ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचे निधन झाल्याचे रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे.
फ्रेड्रिला नेमकं काय झालं होतं याचा खुलासा करताना दयानंद शेट्टी म्हणाले त्यांचे यकृत निकामी झाले होते. यामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. मुंबईतील तुंगा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, डॉक्टरांचे सगळे प्रयत्न आता निष्फळ ठरले आहेत. सोमवारी रात्री १२च्या सुमारास दिनेश फडणीस यांनी अखेरचा श्वास घेतला.आज (५ डिसेंबर) दिनेश फडणीस यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत.
सीआयडी ही मालिका नसून काही जणांसाठी एक भावना होती. या मालिकेने इतिहास रचला होता तसेच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये या मालिकेचे नावही नोंदण्यात आले होते. १९९८ मध्ये सुरू झालेली ही मालिका २०१८ मध्ये संपली. किंबहुना आज देखील या मालिकेचे एपिसोड टीव्हीवर पुनःप्रक्षेपणामध्ये आवडीने पाहिले जातात.दया-अभिजीत यांची फायटिंग, एसीपी प्रद्युमन यांचे बुद्धीच्यातुर्य व फ्रेडी ची कॉमेडी या सर्वच गोष्टी प्रेक्षकांना फार आवडायच्या.
सीआयडी व्यतिरिक्त दिनेश यांनी अदालत, सीआयडी स्पेशल ब्युरो, तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकांमध्येही अभिनय केलाय. याशिवाय ते आमिर खानच्या चित्रपट 'सरफरोश' आणि हृतिक रोशनच्या 'सुपर ३०'मध्येही दिसला होते.दिनेश फडणीस यांची प्राणज्योत मालवली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.