प्रेमकथेचा खुलासा करताना काय म्हणाली? अभिनेत्री- शिवानी सुर्वे
'तू जीवाला गुंतवावे' या मालिकेमुळे अजिंक्य आणि माझी भेट झाली.खऱ्या अर्थाने आमच्या प्रेम कथेला 'तु जीवाला गुंतवावे' च्या सेट वरून सुरुवात झाली असं म्हणायला काहीच हरकत नाही. सुरुवातीला मी आणि अजिंक्य अगदी मित्र-मैत्रिणी होतो. आमच्यात प्रेम असं काहीच नव्हतं पण अजिंक्यच्या एन्ट्री नंतर तीन महिन्यांनी ही मालिका बंद पडली मालिका बंद पडल्यानंतर मला आमच्यात "मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे" अशी काहीतरी गोष्ट आमच्या नात्यात आहे या गोष्टीची जाणीव झाली.
सेट वरती आमची मैत्री फक्त हाय-हॅलोपूर्तीच होती पण जेव्हा शूटिंग बंद झालं तेव्हा मला हाय हॅलो च्या पलीकडच्या गोष्टींची कमी भासु लागली त्यानंतर खऱ्या अर्थाने आमच्या नात्याला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. अजिंक्य स्वभावाने खूप चांगला आहे. अजिंक्यचा आणि माझा स्वभाव खूप विरुद्ध आहे 2015-16 च्या दरम्यान आम्ही दोघं रिलेशनशिप मध्ये आलो साधारण एक वर्षानंतर मी माझ्या आईला आमच्या त्याबद्दल सांगितलं. माझ्या आईने हे केवळ आकर्षण आहे. हे प्रेम वगैरे काही नाही या गोष्टी तू डोक्यातून काढून टाक असं तिने मला ठणकावून सांगितलं. अजिंक्यच्या घरून सुद्धा आमच्या नात्याला ठळक विरोधच होता.
त्यानंतर आम्ही लॉक डाऊन मध्ये एकत्र राहू लागलो. अजिंक्यच्या बाबांच असं मत होतं की तुम्ही लॉक डाऊन मध्ये एकत्र राहू शकतात तर तुम्ही आयुष्यही सोबत काढू शकता.त्यानंतर आमच्या दोघांच्याही घरच्यांना खात्री पटली की हे दोघं अत्यंत प्रेमात आहेत. आणि हे जीवन साथी बनण्यायोग्य आहेत. त्यानंतर आमच्या दोघांच्या घरच्यांनी आमच्या नात्याचा स्वीकार केला. आम्ही आमच्या प्रेमकथेचा शेवट लग्न बंधनात अडकून करणार आहोत ही गोड बातमी आम्ही लवकरच आमच्या चाहत्यांना देऊ असं देखील शिवानी पुढे म्हणाली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.