नखरेवाली चित्रपटाचं शूटिंग संपूर्ण !
आनंद एल राय यांच प्रख्यात प्रॉडक्शन हाऊस कलर यलो प्रॉडक्शन आणि त्यांचा नवीन चित्रपट "नखरेवाली" याच शूट यशस्वीपणे पूर्ण झाल्याची घोषणा त्यांनी केली आणि या बद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. अंश दुग्गल आणि प्रगती श्रीवास्तव या दोन उदयोन्मुख कलावंतांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट भारतीय चित्रपट उद्योगातील नवीन कलाकारांना व्यासपीठ देणार आहे.
रॅप-अप सेलिब्रेशनला चित्रपटा ची संपूर्ण टीम उपस्थित होती यात हिमांशू शर्मा, दिग्दर्शक राहुल शांकल्या आणि लेखिका दिव्य निधी शर्मा यांच्या सोबतीने अनेक कलाकार देखील होते.
हा चित्रपट संपूर्ण एंटरटेनर असणार आहे अशी आशा आनंद एल राय व्यक्त करतात. कलर यलो प्रॉडक्शन ने भारतीय चित्रपटसृष्टीवर कायमस्वरूपी प्रभाव पाडला आहे आणि नवनवीन कलाकृती घडवल्या आहेत. "शुभ मंगल सावधान," "तनु वेड्स मनु," आणि "रांझना" सारख्या चित्रपटांनी आयकॉनिक दर्जा प्राप्त केला असून आता "नखरेवाली" ही परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी सज्ज आहे.
हा चित्रपट आनंद एल राय आणि ज्योती देशपांडे यांच्यातील मराठी फ्रँचायझी "झिम्मा 2" सोबतच्या अलीकडच्या यशानंतरच्या दुसऱ्या सहकार्याला देखील चिन्हांकित करतो. "नखरेवाली" चे उत्पादन संपत असताना, चाहते आणि चित्रपट प्रेमी कलर यलो प्रॉडक्शन आणि जिओ स्टुडिओ यांच्यातील रोमांचक भागीदारीची आतुरतेने अपेक्षा करतात. "नखरेवाली" नक्कीच खास असणार यात शंका नाही.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.