मानुषी छिल्लर दिसणार या नव्या चित्रपटात !
मानुषी छिल्लर, अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ स्टारर "बडे मिया छोटे मियाँ " या वर्षीच्या एप्रिलमध्ये ईदला प्रदर्शित होणाऱ्या मोठ्या चित्रपटा पैकी एक चित्रपट आहे. आता या चित्रपटात मिस वर्ल्ड मानुषी सुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 24 जानेवारीला या चित्रपटाचा टीझर लॉन्च होणार असून या बड्या कलाकारांसोबत आता मानुषी सुद्धा आपल्याला मोठ्या पद्यावर लवकरच दिसणार आहे. मानुषी चिल्लर सध्या सगळ्या कलाकारांसह जॉर्डनमध्ये शूट करत असून 2 फेब्रुवारीपर्यंत तीन गाण्याच्या शूट साठी चित्रपटाची सगळी टीम काम करत असल्याचं कळतंय.
अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटात ती नेमकी काय भूमिका साकारणार आहे हे निर्मात्यांनी अद्याप सांगितलं नाही तरीही सूत्रां च्या माहिती नुसार या चित्रपटात हॅकरची भूमिका करणार असल्याचं कळतंय. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
"बडे मियाँ छोटे मियाँ " मध्ये अक्षय कुमारसोबत तिचं काम हे तिच्या कामाची अनोखी बाजू दाखवणार आहे. मानुषी 16 फेब्रुवारी रोजी रिलीज होणाऱ्या तेलगू स्टार वरुण तेज सोबत तिचा द्विभाषिक चित्रपट "ऑपरेशन व्हॅलेंटाईन" मध्ये सुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.