'फाइटर'चं दुसरं गाणं म्हणजे बेशरम रंग 2.0? 'इश्क जैसा कुछ' प्रेक्षकांच्या भेटीला
अभिनेता हृतिक रोशन त्याच्या आगामी 'फायटर' चित्रपटामुळे सतत चर्चेत आहे. एरियल अॅक्शन फ्रँचायझीचा हा पहिला चित्रपट सिद्धार्थ आनंद याने दिग्दर्शित केला आहे. प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांची जोडी कमाल दिसत आहे. 'शेर खुल गये' या गाण्यानंतर 'फायटर'चे दुसरे गाणे 'इश्क जैसा कुछ' रिलीज झाले आहे. आता दीपिका आणि हृतिकची जबरदस्त केमिस्ट्री या गाण्यात पाहायला मिळत आहे.
'इश्क जैसा कुछ' हे गाणे कुमार यांनी लिहिले आहे. तर विशाल-शेखर, शिल्पा राव आणि मेलो डी यांनी गायले आहे. या गाण्याचे आकर्षक व्हिज्युअल आणि फूट-टॅपिंग बीट्स हे आहेत. ‘इश्क जैसा कुछ’ हे गाणं नक्कीच खास ठरणार असं दीपिका आणि हृतिकच्या चाहत्यांना वाटत आहे.
आता हे गाणे सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. मात्र अनेकांना हे गाणे दीपिकाच्या पठाण चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यासारखेच असल्याचे वाटत आहे.फायटर' बद्दल बोलायचे तर हा बॉलिवूडच्या एरियल अॅक्शन फ्रँचायझीचा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटात हृतिक रोशनशिवाय दीपिका पदुकोण आणि अनिल फायटर पायलटच्या भूमिकेत दिसणार आहेत. सिद्धार्थ आनंदचा हा चित्रपट आता 2024 मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त म्हणजे 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.