नात्यात दुरावा नको, आजपासुनच सुरु करा या गोष्टी
१. संवाद कमी होऊ देऊ नका
"नियमितपणे भावना व्यक्त न केल्याने, लहान लहान समस्या दडपल्या गेल्याने, बाटलीबंद भावनांमध्ये बदलतात ज्याकी कमीतकमी अपेक्षित असताना स्फोटक संघर्षात उकळायला सुरवात होते ," म्हणून नात्यात संवाद महत्वाचा आहे. पती-पत्नी सहसा खूप कठोरपणे संभाषण सुरू करतात, एकमेकांना दगड मारतात आणि निष्क्रिय आक्रमकतेकडे वळतात. असे ना करता शांततेत बोलून भांडण मिटवा.एखाद्या परिस्थितीमुळे तुमचा जोडीदार दुखावल जाईल असं भाष्य करणं टाळा.
२.भावना व्यक्त करत राहा
खूप वर्षांपासून सुरू असलेल्या मैत्रीच्या नात्यात,प्रियकर व प्रियसीच्याच नात्यात नव्हे तर, लग्नानंतर नवरा बायकोच्या नात्यात देखील तोच तोपणा यायला सुरुवात होते. तेव्हा नाती व्यक्त होण्याचं थांबवतात अशा चुका कधीही करू नका. तुमच्या जोडीदाराची मनापासून विचारपूस करा. तुम्हाला काय हवे आहे काय नको आहे त्यांच्या आवडीनिवडी न विसरता जोपासा.
३.रागात असताना संवाद टाळा
लोकांना वाईट सवय असते ती म्हणजे रागात खूप काही बोलून जाण्याची. रागात तोंडावर ताबा ठेवा.तुमच्या जोडीदाराच्या मनात तसं काही नसतं पण रागावर नियंत्रण नसल्याने भांडणात ते बोलून गेल्याने तुम्ही दुखावाले जाता. त्यामुळे नेहमी भांडताना आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. आपण ज्याच्याशी भांडतोय त्याच्याशी अख्खं आयुष्य काढणार आहोत हे विसरू नका, त्यामुळे तुमचा एक चुकीचा शब्द तुमच्याविषयी जोडीदाराच्या मनात असलेला आदर नष्ट करू शकतो. राग शांत झाल्यानंतर बोला.
४.एकमेकांवर विश्वास ठेवा
नात्याचा पाया हा विश्वासावर आधारित असतो. तो तुटला तर नातं पत्त्यांसारखं कोसळायला वेळ लागत नाही. त्यामुळे आपल्या जोडीदारावर खूप विश्वास ठेवा. जोपर्यंत तुम्ही स्वत:हून काही चूकीचं स्वत:च्या डोळ्यांनी पाहत किंवा अनुभवत नाही किंवा जोडीदाराला जाब विचारायला ठोस पुरावा नसेल तोवर त्याच्यावर विश्वास ठेवा.कानामध्ये आणि डोळ्यत ४ बोटांचे अंतर असते हे विसरू नका.
५.एकमेकांचा आदर करा
प्रेमासोबत आदर देणे खूप गरजेचे आहे. फक्त प्रेम आहे आणि जर त्यात एकमेकांना आदर नसेल तर त्या प्रेमाला काही अर्थ नाही. ते नातं एखाद्या गुलामगिरी सारखं राहील. एकमेकांशी बोलताना, मज्जा मस्ती करताना एक मर्यादा ठेवावी. इतर नातेवाईकांसमवेत असताना एकमेकांना सन्मान द्यावा.म्हणून आदर देणे देखील तितकेच गरजेचे आहे.
नाती टिकवण्यासाठी या गोष्टी करणं विसरू नका.