अर्चना ते बिग बॉस अभिनेत्री अंकिता लोखंडेचा अनोखा प्रवास
अभिनेत्री अंकिता लोखंडे यंदाचा वाढदिवस बिग बॉस च्या घरात साजरा करणार असून तिच्या या अनोख्या प्रवासाची गोष्ट कायम अतुलनीय राहिली आहे. अर्चना या भूमिकेने तिने टीव्ही मालिकेत पदार्पण केलं आणि आज ती पती विकी जैनसोबत बिग बॉस 17 च्या घरात प्रेक्षकांची आणि घरातील सदस्यांची मने जिंकत आहे.
"पवित्र रिश्ता" या शोमध्ये अर्चना देशमुखच्या भूमिकेत पदार्पण केल्यावर अंकिताच्या कारकिर्दीत ची सुरुवात झाली. तिला सर्वत्र ओळख मिळाली आणि तिने बॉलीवूडमध्ये यशस्वीपणे पदार्पण करून "मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी" मध्ये शूर योद्धा झलकारीबाईची भूमिका साकारली आणि "बागी 3" सारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. तिच्या OTT पदार्पणात अंकिताने 'पवित्र रिश्ता: इट्स नेव्हर टू लेट' मधील तिची भूमिका अर्चना पुन्हा साकारली आणि 'द लास्ट कॉफी' या डिजिटल चित्रपटात इराम कुरेशीच्या भूमिकेत आकर्षक अभिनय केला.
अंकिता लोखंडे ही कायम प्रेक्षकांना मोहित करून जाणारी अभिनेत्री आहे. कायम आव्हानात्मक भूमिका स्वीकारून अभिनेत्री म्हणून ती तिची बाजू पक्की करत आहे. रणदीप हुडा सोबत "स्वातंत्र्य वीर सावरकर" मध्ये आगामी काळात ती झळकणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.