'बिग बॉसच्या' घरात साजरा करणार अंकिता आणि विकी लग्नाचा वाढदिवस
बिग बॉस च्या घरात चर्चेत असलेल कपल म्हणजे अंकिता लोखंडे आणि विकी जैन. 14 डिसेंबर 2021 रोजी त्यांच्या अखंड प्रेमाने दोघं लग्नबंधनात अडकले आणि कायमचे एकमेकांचे झाले. त्यांच्या प्रेमाची केमेस्ट्री ही सगळ्यांना माहीत आहे आणि हे पॉवर कपल बिग बॉस 17 च्या घरात धुमाकूळ घालत आहे.
लोकप्रिय मालिका पवित्र रिश्तामधील अर्चनाच्या भूमिकेसाठी ओळखल्या जाणार्या अंकिता लोखंडेने विकी जैन या व्यावसायिकासोबत लग्न केले आणि हे जोडपे त्यांचा काही मित्रांद्वारे भेटले आणि अनेक वर्षांपासून एकत्र आहेत. ते त्यांच्या नात्याबद्दल खुलेपणाने बोलतात त्यांनी सोशल मीडियावर स्वतःचे अनेक फोटो शेअर देखील केले आहेत. अंकिता आणि विकीची लव्हस्टोरी तितकीच खास आहे. एकमेकांना साथ देत त्यांनी अनेक चढ-उतारांचा सामना केला आणि आजही तितकेच सोबत आहेत.
बिग बॉसच्या घरात ही जोडी सुपरहिट ठरत असून यंदाचा लग्नाचा वाढदिवस ते या खास घरात साजरा करणार आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.