इतिहास संशोधक अमर दांगट यांनी त्यांच्या पुस्तक लेखनाचा समारोप शहाजीराजे भोसले समाधीस्थळी केला.
शहाजीराजे भोसले यांचा हाच इतिहास लवकरच 'रणधुरंधर शहाजीराजे' या पुस्तकाच्या माध्यमातून सामान्य जनतेपर्यंत पोहचवला जाणार आहे. या पुस्तकाचे लेखन पुणे येथे राहणारे इतिहास अभ्यासक, संशोधक अमर युवराज दांगट करत असून त्यांनी या पुस्तकाच्या समारोपाचे लेखन शहाजीराजे भोसले यांच्या समाधीस्थळी म्हणजेच कर्नाटक राज्यातील शिमोगा जिल्ह्यातील होदीगेरे या गावी केले.
याविषयी बोलताना अमर दांगट म्हणाले, छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली, मात्र त्यांची प्रेरणा शहाजी राजांनी त्यांना दिली.मी मागील पाच वर्षांपासून या विषयावर संशोधन करत आहे. या पुस्तकाचे लिखाण करताना मी असंख्य फारसी, डच, पोर्तुगीज इंग्रजांचे रेकॉर्डस तसेच तमिळ, कन्नड, संस्कृत प्राकृत आणि मराठीतील सर्व संदर्भ घेतलेले आहेत. या कागदपत्रांचा अभ्यास केला आहे. आपल्याला छत्रपतीं शिवरायांचा इतिहास माहिती आहे, मात्र त्यांची पार्श्वभूमी फारसी माहिती नाही माझ्या या पुस्तकाचा उद्देश ती पार्श्वभूमी सामान्य वाचकांपर्यंत घेऊन जाणे हाच आहे. हे पुस्तक ऐतिहासिक दस्तावेजांच्या आधारेच लिहिलेले आहे, त्याला ऐतिहासिक स्थळांचाही स्पर्श व्हावा, महाराजांचा आशीर्वाद लाभावा यासाठी मी पुस्तकाच्या लेखनाचा समारोप शहाजीराजे भोसले यांच्या समाधीस्थळी केला आहे. 'रणधुरंधर शहाजीराजे' हे अमर दांगट यांचे सहावे पुस्तक असून लवकरच प्रकाशित होणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.