निर्माते आनंद एल यांच्या झिम्मा 2 ची छप्परफाड कमाई !
प्रसिद्ध निर्माते आनंद एल राय यांनी पुन्हा मराठी सिनेमात आपल्या निर्मिती ची जादू दाखवून दिली आहे. 2023 वर्षात त्यांच्या "झिम्मा 2 " ने ब्लॉकबस्टर कमाई करून मराठी सिनेमात आपली छाप पाडली आहे. झिम्मा 2 हा मराठी चित्रपटसृष्टीत यंदाच्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे.बॉक्स ऑफिसवर या "झिम्मा 2" ने रिलीज झाल्यापासून तब्बल 14 कोटींची कमाई केली असून मराठी सिनेमाच्या क्षेत्रात कलर यलोची छाप दृढपणे प्रस्थापित केली आहे.
2023 हे वर्ष झिम्मा 2 मुळे मराठी सिनेमासाठी खास ठरलं आणि ख्यातनाम चित्रपट निर्माते आनंद एल राय यांच्याकडे "झिम्मा 2" च यश जोरदार साजर केलं आहे. मराठी निर्मितीचे यश साजर करून हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे. झिम्मा 2 ची कथा सगळ्यांना भावली आणि जगभरात त्याने कौतुक मिळवलं. झिम्मा 2 ची कमाई ही अपेक्षेपलिकडची आहे. अनोख्या आणि ग्राउंडब्रेकिंग कथांसाठी ओळखले जाणारे प्रादेशिक चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी आनंद एल राय कायम चर्चेत असतात. "झिम्मा 2" च्या अनोख्या यशाने ते एक दूरदर्शी निर्माते आहे हे स्पष्ट होत.
आनंद एल. राय यांच्या मराठी सिनेनिर्मितीत "आत्मपॅम्पलेट" ने जागतिक स्तरावर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडला आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील समृद्ध कथाकथनाची अनोखी बाजू दाखवून हा चित्रपट प्रतिष्ठित बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाची प्रशंसा झाली. "गुड लक जेरी" आणि "अॅन अॅक्शन हिरो" सारख्या अलीकडील त्यांच्या यशांसह हा वारसा पुढे चालवत आनंद एल राय यांनी "झिम्मा 2" च्या दमदार कमाई ने ते एक उत्तम निर्माते आहेत हे यातून दिसून येत " जिओ स्टुडिओ आणि चलचित्र मंडळी यांच्या सहकार्याने आनंद एल राय यांच्या कलर यलो द्वारे निर्मित "झिम्मा 2 " ने जगभरात चर्चा झाली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.