सोनू सूद बनला देशातील दिव्यांगांचा आवाज
परोपकारासाठीच्या त्याच्या अतूट बांधिलकी साठी सोनू कायम चर्चेत असतो आणि नव्या वर्षात सोनू सूद अपंगांच्या गरजासाठी आवाज उठवणार आहे. देशातील दिव्यांग लोकांचा आवाज बनून त्याने अलीकडेच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. संबंधित अधिकारी आणि राज्य सरकारांना अपंग व्यक्तींसाठी मूलभूत उपदान आणि किमान पेन्शनचा पुनर्विचार आणि वाढ करण्याचे आवाहन त्याने या पोस्ट मधून केल आहे. "माझा नवीन वर्षाचा संकल्प ❤️🙏"अपंगां च्या हक्कासाठी लढण "
मी संबंधित अधिकारी आणि राज्य सरकारांना नम्रपणे विनंती करतो की अपंगांच्या मूलभूत ग्रॅच्युइटी आणि किमान पेन्शनमध्ये योग्यरित्या सुधारणा करून त्यांना त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करावी. त्यांच्यासमोर असलेल्या अंतर्निहित आव्हानांना आर्थिक ताण कमी करण्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे.
सोनू सूदने दिव्यांगांसाठी अधिक मदतीसाठी केलेला प्रामाणिक प्रयत्न खरोखर उल्लेखनीय आहे. या वर्षी तो "फतेह" नावाच्या चित्रपटात काम करणार आहे. सोनू आणि जॅकलीन फर्नांडिस या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.