अखेर "मेरी ख्रिसमस" या क्राईम रोमान्स चा ट्रेलर प्रदर्शित
यंदाच्या वर्षी चर्चेत राहिलेली अभिनेत्री म्हणजे कतरिना कैफ. कतरिना आणि आणि विजय सेतुपती यांच्या मोस्ट अवेटेड रिलीज असलेल्या मेरी ख्रिसमसचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि पुन्हा एकदा हे दोघे चर्चेचा विषय ठरले आहेत. श्रीराम राघवन दिग्दर्शित आणि टिप्स फिल्म्सचे रमेश तौरानी आणि जया ततौरान संजय राउत्रे आणि केवल गर्ग निर्मित हा चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी रिलीज होणार आहे.
चित्रपटा चा ट्रेलर रोमान्सच्या च्या सोबतीने थ्रिलर सस्पेन्स दाखवणार आहे यात शंका नाही. उत्कंठावर्धक कथा आणि क्राईम रोमान्स यांचा अनोखा मिलाफ यातून अनुभवयाला मिळणार आहे. ट्रेलर ने प्रेक्षकांना आता चित्रपटाची वाट पाहायला लावलं आहे. मोहक आणि आश्चर्याची प्रतीक्षा आहे. द्विभाषिक चित्रपट आणि निओ-नॉयर झोनमध्ये असलेला हा ड्रामा नक्कीच काहीतरी कमाल असणार आहे आणि जी जादू मोठ्या पडद्यावर बघण्याची उत्सुकता आता निर्माण झाली आहे.
रोमँटिक क्राइम थ्रिलर सगळ्यांना मोहित करणार आहे याची खात्री तर आहे पण हा चित्रपट कतरिना साठी नक्कीच खास ठरणार यात शंका नाही.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.