सोनू उभारतो नवं वृद्धाश्रम !
अभिनेता आणि परोपकारी समाजसेवक सोनू सूदने द सूद फाऊंडेशनच्या माध्यमातून एक अर्थपूर्ण प्रकल्प सुरू केला आहे. सोनू ने त्यांची आई सरोज सूद यांच्या नावाने एक विशेष वृद्धाश्रम सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
हा प्रकल्प नक्कीच खास आहे कारण जगातल्या किती तरी मातांना ही श्रद्धांजली आहे आणि मुले आणि पालक यांच्यातील मजबूत बंधन आहे. आपल्या सेवाभावी कार्यासाठी ओळखला जाणारा सोनू सूद ने या उपक्रमाद्वारे वृद्धांना आपलंसं केलं आहे. सरोज सेरेनिटीचे उद्दिष्ट ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आरामदायक वातावरण तयार करणं आहे ज्यांची मुले विविध कारणांमुळे त्यांच्यासोबत राहू शकत नाही जिथे ते आनंदाने आणि सन्मानाने आणि प्रेमाने वाढू शकतात हा या मागचा हेतू आहे. सोनू सूद फाऊंडेशन कायम सकारात्मक भूमिका बजावत असताना हा नवा प्रकल्प समाजावर प्रभाव पाडणार आहे.
सिनेमा आघाडीवर सोनू सूद सायबर क्राइम वर आधारित 'फतेह' करत असून त्याच्या पहिल्या निर्मिती आणि दिग्दर्शनाच्या क्षेत्रात हे पदार्पण असणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.