अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ 'बडे मियाँ छोटे मियाँ' च्या रिलीजच्या तयारीत!
बॉलीवूडचा तरुण अॅक्शन सुपरस्टार म्हणजे टायगर श्रॉफ हा त्याच्या 2024 मधल्या पहिल्या रिलीज साठी सज्ज होत असून 2024 च्या ईदला रिलीज होणार्या "बडे मियाँ छोटे मियाँ" मध्ये अक्षय कुमारसह तो मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाची चमक दाखवण्यासाठी सज्ज होत आहे. या चित्रपटाभोवतीची अपेक्षा सगळ्यांना आहे. चाहत्यांना पुन्हा एकदा "टायगर इफेक्ट" बघायचा असून ते त्या साठी उत्सुक आहेत. या सिनेमातील डायनॅमिक अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडिया वर ही खास पोस्ट शेयर केली असून त्याला हटके कॅपशन दिलं आहे. “बडे और छोटे से मिलने का समय हो गया है और कम बस #3MonthToBadeMiyaan-ChoteMiyaan
जसजशी रिलीजची तारीख जवळ येत आहे तशी प्रेक्षकांना या बद्दलची उत्सुकता आहे. बॉलिवूडचा तरुण अॅक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफ हा नव्या रुपात सगळ्यांना यातून दिसणार आहे. यंदाची ईद ही एका सणा पेक्षा मोठी होणार आहे. टायगरच्या सिनेमॅटिक शैलीची झलक अनुभवण्यासाठी आता सगळेच उत्सुक आहेत. आगामी काळात टायगर रोहित शेट्टीचा सिंघम अगेन आणि सिद्धार्थ आनंदचा मार्फ्लिक्स पिक्चर्सचा रॅम्बो मध्ये दिसणार असून त्याच दिग्दर्शन रोहित धवन करणार आहेत. "बडे मियाँ छोटे मियाँ" टाइगर सज्ज होत टायगर इफेक्टचे साक्षीदार होण्यासाठी प्रेक्षक सज्ज होताना दिसतात.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.