या वर्षी तमन्ना भाटिया असा साजरा करणारा वाढदिवस !

यंदाच्या वर्षात कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री ठरली ती म्हणजे तमन्ना भाटिया.

TamannaahBhatiabirthdaybash

या वर्षी तमन्ना भाटिया असा साजरा करणारा वाढदिवस !

तिचे यंदाच्या वर्षात अनेक चित्रपट रिलीज झाले आणि यातून तिने प्रेक्षकांना जिंकून घेतलं. रेड कार्पेट वरचा अनोखा अंदाज असो किंवा अनेक फॅशन आयकॉन म्हणून असलेली तिची ओळख तमन्ना भाटिया ही तिच्या कामामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री ठरली आहे.

व्यस्त शेड्यूलमध्ये असलेली ही अभिनेत्री यंदाचा वाढदिवस सेटवर साजरा करणार असून कामात राहून हा वाढदिवस ती खास करणार आहे. तमन्नाने तिचा वाढदिवस तिला सर्वात जास्त आवडत असलेल्या गोष्टींमध्ये साजरा करण्याबद्दल म्हणते "आणखी एक वर्ष, आणखी एक वाढदिवस ! यंदाचा वाढदिवस हा कामात राहून साजरा करणार आहे. सेटवरच काम इथली लोक आणि निर्मिती असलेल्या या गोष्टीत माझा वाढदिवस साजरा करण्याची मज्जा वेगळी आहे. वर्किंग वाढदिवस साजरा करून येणाऱ्या वर्षात अजून उत्तम काम करायचं आहे "असे तमन्ना म्हणते आहे.

तमन्ना चित्रपटसृष्टीत चमकत असून याव्यतिरिक्त ती जॉन अब्राहम सोबत निखिल अडवाणीचा हिंदी चित्रपट " वेदा " मध्ये दिसणार आहे ह चित्रपट 2024 मध्ये रिलीज होणार आहे सोबतीला बहुप्रतिक्षित तमिळ चित्रपट "अरनामनाई 4" मध्ये दिसणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story