'ॲनिमल' साठी बॉबी देओल शिकला सांकेतिक भाषा
ॲनिमल सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजतो आहे. सिनेमात बॉबी देओलच्या भूमिकेची खास चर्चा आहे. या भूमिकेसाठी त्याला मोठी मेहनत घ्यावी लागली असल्याचं बॉबी देओल सांगितलं.ॲनिमल सिनेमात व्हिलन बनलेला बॉबी देओल एकही डायलॉग नसताना रणबीर कपूरवरही भारी पडला. बॉबी देओलचा आवाज कुठेही सिनेमात ऐकू येत नाही. केवळ ॲक्शनच्या, भूमिकेच्या जोरावर त्याने प्रेक्षकांवर आपली छाप पाडली आहे. एका मुलाखतीत अभिनेत्याने या भूमिकेसाठी त्याला किती मेहनत करावी लागली याबाबत सांगितलं आहे.ज्यावेळी दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी सिनेमात त्याचा एकही डायलॉग नाही हे सांगितलं त्यावेळी ऐकून हैराण झालो होतो. संदीपने तुझी भूमिका मुक्याची असल्याचं सांगितलं. सिनेमात म्यूट भूमिका असावी असं संदीपने सांगितलं. त्यावेळी आधी हैराण झालो होतो,
पण नंतर ही आव्हानात्मक भूमिका पार पाडण्याचं ठरवून, संदीपला होकार दिल्याचं अभिनेत्याने सांगितलं.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.