बॉलिवुडचा आयकॉन सोनू सूद ची एपिक अॅडव्हेंचरसह रोलरकोस्टर राइड
सोनू सूदन हा कायम त्याच्या अभिनयातून सामाजिक कार्यातून सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असताना, आता तो त्याचा फतेह या आगामी
चित्रपटासाठी सज्ज होताना दिसत आहे. पर्वतांमधून एका रोमांचक साहसी प्रवासात तो जाऊन आला आहे. त्याने त्याच्या राईटचा व्हिडिओ त्याच्या सोशल मीडिया वर शेयर देखील केला आहे.
वैभवशाली शिखरांमध्ये इंजिन चा आवाज सोनू चा फिटनेस आणि अॅड्रेनालाईन-पंपिंगच साहस ! वळणदार रस्ते आणि आव्हानात्मक साहस करताना सोनू त्या व्हिडिओ मध्ये दिसला आहे. तरुणांनी खरोखरच सोनू सुदला त्यांचे फिटनेस मोटिवेशन म्हणून पाहिला काहीच हरकत नाही असं प्रत्यक्षरीत्या सोनू सूदच्या या फोटोज मधून दिसत आहे.
सोनूचा हा प्रवास केवळ निसर्गरम्य जॉयराईड नसून सोनू सूदच्या साहसी कृत्याचा पुरावा देणारा आहे. सोनू सूदने ‘फतेह’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले असून ही एक व्हिज्युअल ट्रीट आहे. फतेह 2024 मध्ये रिलीज होणार असून सगळेच त्यासाठी उत्सुक आहेत. यावेळी आता सोनू सूद कढून वेगळा काय बघायला मिळणार आहे. हे आता 'फतेह' चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.