चर्चा मिसमॅच्ड सीझन 3 ची
मिसमॅच्ड सीझन3 येणार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला अभिनेता रोहित सराफने पहिला फोटो पोस्ट करून चाहत्यांना दिली खुशखबर.
रोहित सराफने सोशल मीडिया वर काही खास फोटो पोस्ट करून त्याचा चाहत्यांना खुश खबर दिली आहे.आणि लवकरच मिसमॅच्ड 3 येणार असल्याची एक झलक दाखवली आहे. चर्चेत असलेल्या या वेब सीरिज साठी सगळेच उत्सुक असताना आता याचा तिसरा सीजन येणार असल्याचं कळतंय. रोहित सराफ आणि प्राजक्ता कोळी या कलाकारांनी चाहत्यांना पुढच्या सीजन येणार असल्याची एक झलक दाखवली आहे. दिग्दर्शक आकर्ष शर्मासह या तिघांनी एक खास फोटो सोशल मीडिया वर शेयर केला असून आता लवकरच मिसमॅच्ड 3 चा सीजन येणार आहे.
चाहत्यांची आवडती वेब सीरिज मिसमॅच्ड 3 ही सुरुवातीपासूनच चर्चेत असलेली सीरिज आहे. सुरुवातीच्या दोन सीझनमध्ये रोहित सराफचे पात्र ऋषी सिंग शेखावत याने प्रेक्षकांना आपलंसं केल आहे. रोमान्स आणि विनोद यांचा अनोखा अंदाज यातून अनुभवयाला मिळाला होता. सीझन 3 ची उत्सुकता बघायला मिळत असून हास्य, प्रेम आणि अप्रत्याशित ट्विस्टने भरलेल्या मिसमॅच्डच्या मनमोहक दुनियेत पुन्हा प्रवेश करण्यास सगळेच उत्सुक आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.