अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका!

मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्रेयस तळपदे आत्ता ४७ वर्षांचा आहे.

ShreyasTalpadeheartattack

अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका !

 घटना घडण्यापूर्वी, श्रेयस नुकताच एका चित्रपटाच्या शूटिंग वरून माघारी आला होता. तो 'वेलकम टू जंगल' सिनेमाच्या चित्रीकरणानंतर  घरी आला तेव्हा ही घटना घडली. श्रेयसने पत्नीला अस्वस्थ वाटत असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर मुंबईतल्या अंधेरीमध्ये असलेल्या बेलव्हू रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रेयस पूर्णपणे बरे होता आणि त्यांनी अंडरप्रॉडक्शन मल्टीस्टारर चित्रपट, 'वेलकम टू द जंगलसाठी' त्याने संपूर्ण दिवस शूट केले. “ दिवसभर चित्रीकरण केले, तो पूर्णपणे ठीक होता आणि सेटवर सर्वांशी विनोद करत होता. त्याने थोडेसे अॅक्शन असलेले सीक्वेन्स शूट केले. शूट संपल्यानंतर तो घरी परतला आणि त्याने पत्नीला सांगितले की त्याला अस्वस्थ वाटत आहे. तिने त्याला हॉस्पिटलमध्ये नेले पण तो वाटेतच कोसळला,” श्रेयसला संध्याकाळी उशिरा रुग्णालयात आणण्यात आले. 

श्रेयस तळपदे हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या कामासाठी त्याची प्रशंसा केली जाते श्रेयस मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत अतिशय नावाजलेला हिरो आहे. दोन दशकांच्या कारकिर्दीत श्रेयस तळपदे यांनी 45 हून अधिक चित्रपट केले आहेत.

श्रेयस आत्ता जंगल स्टार्समध्ये अक्षय कुमार रवीना टंडन, दिशा पटानी, जॅकलिन फर्नांडिस, लारा दत्ता, सुनील शेट्टी, संजय दत्त, परेश रावल, अर्शद वारसी, तुषार कपूर, राजपाल यादव, जॉनी लीव्हर, किकू शारदा, कृष्णा अभिषेक या मोठ्या कलाकारांसोबत आगामी चित्रपटात आपल्याला दिसणार आहे. लवकरच श्रेयसच्या प्रकृतीत सुधारणा होऊन पूर्वीप्रमाणे तो शूटिंगला जाईल आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करेल अशी भावना सर्व प्रेक्षकांच्या मनात आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story