'६९ व्या सवाई गंधर्व भीमसेन' महोत्सवाला सुरुवात !
परंपरेप्रमाणे जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यानातील सवाई गंधर्व यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करीत ६९ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला आज सुरुवात झाली. दरवर्षी सवाई गंधर्व यांचे कुटुंबीय आणि भारतरत्न पं भीमसेन जोशी यांचे कुटुंबीय एकत्र येत सवाई गंधर्व यांच्या पुतळ्याला हार घालत अभिवादन करत असतात. गेली ५० वर्षे ही परंपरा अव्याहतपणे सुरु आहे.
पंडित भीमसेन जोशी यांनी आपले संगीतातले गुरू रामभाऊ कुंदगोळकर यांच्या स्मरणार्थ ‘सवाई गंधर्व महोत्सवा’ची सुरुवात केली आणि गुरुभक्तीचे उदाहरण घालून दिले. भीमसेन जोशींच्या निधनानंतर ह्या संगीत महोत्सवाचे नाव ’सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ असे बदलण्यात आले.
आज या प्रसंगी आर्य संगीत प्रसारक मंडळाचे विश्वस्त श्रीनिवास जोशी, शिल्पा जोशी, विराज जोशी, शुभदा मुळगुंद, पं उपेंद्र भट, आनंद भाटे, डॉ प्रभाकर देशपांडे, मिलिंद देशपांडे, पद्मा देशपांडे, शैला देशपांडे, श्रुती देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.