थंडीत अशी घ्या स्वतःची काळजी!

हिवाळा सुरुझाल्यामुळे अनेक ठिकाणी थंड वारे वाहतायत. याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊन तुम्ही आजारी पडू शकता.थंडीच्या दिवसांत आपल्या आरोग्याचे संरक्षण कसे करावे, यासाठी जाणून घेऊया काही सोप्या टिप्स.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Shital Jagtap
  • Wed, 6 Dec 2023
  • 05:23 pm

थंडीत अशी घ्या स्वतःची काळजी!

भारतातील अनेक शहरांमध्ये गोठवणारी थंडी सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी थंड वारे वाहतायत. याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊन तुम्ही आजारी पडू शकता.आरोग्याची योग्य ती देखभाल करण्यास सुरुवात करा.थंडीच्या दिवसांत आपल्या आरोग्याचे संरक्षण कसे करावे, यासाठी जाणून घेऊया काही सोप्या टिप्स.

थंडीत अशी घ्या स्वतःची काळजी. 

१.कपड्यांचे करा लेअरिंग

कपड्यांचे लेअरिंग करणे खूप महत्वाचे आहे. असे केल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. तुमचे शरीर उबदार राहण्यास मदत होते. हातात, हातमोजे पायात सॉक्स,मान उबदार ठेवण्यासाठी टोपी,स्कार्फ घालणे आवश्यक आहे.पातळ कपड्यनमध्ये थर्मल्स वापरणे विसरू नका.

२.हायड्रेटेड रहा.

हिवाळ्यात तुम्ही डिहायड्रेशनचेही बळी होऊ शकता. कारण तुम्हाला थंड वातावरणात नैसर्गिकरित्या तहान लागत नाही. दररोज ७-८ ग्लास पाणी पिणे केवळ महत्त्वाचे आहे . डिहायड्रेशनमुळे देखील तुम्हाला जास्त थंडी जाणवू शकते.

३.आहारामध्ये या गोष्टींचा समावेश करा.

आजारांपासून दूर राहण्यासाठी आहारामध्ये अख्खे कडधान्य, दलिया इत्यादी पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. तसंच हिवाळ्यामध्ये अधिक प्रमाणात भाज्या,सूप आणि फळांचं सेवन करावे. फळ,आणि भाज्यांमध्ये व्हिटॅमिन आणि खनिजांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. या पोषक घटकांचा शरीराला पुरवठा झाल्यास आजारांविरोधात लढण्यात मदत मिळते. थंडीमध्ये शक्यतो तेलकट - तिखट खाद्यपदार्थांचे सेवन करणं टाळावे.

४.व्यायाम करणं गरजेचंच 

शरीर फिट राहण्यासाठी आहारासोबतच नियमित व्यायाम करणंही तितकंच गरजेचं आहे. शरीराची योग्य पद्धतीनं हालचाल होणं आवश्यक आहे. आपल्या फिटनेससाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन नियमित व्यायाम करावा. थंडीत तुम्ही योगासन करणं महत्वाचं आहे.

५.घर उबदार ठेवा

तुमचे घर चांगले इन्सुलेटेड आणि ड्राफ्ट-फ्री असेल याची काळजी घ्या. त्याच वेळी थर्मोस्टॅटला आरामदायक तापमानात ठेवा. थंडीपासून स्वतःला वाचवण्यासाठी रात्री पडदे बंद करा आणि ड्राफ्ट बाहेर ठेवण्यासाठी दारेआणि खिडक्यांवर ड्राफ्ट स्टॉपर्स वापरा.अंगावरती उबदार ब्लँकेट्स ओढून झोपा.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story