'3 इडियट्स' मधील 'चतुर' मराठी चित्रपटातुन पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला!
लोकांना कल्पना देखील नाही,ओमी हा अस्सल मराठमोळा मुलगा आहे. प्रेक्षकांसाठी अजून एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे ओमीने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात अमेरिकेतील महाराष्ट्र मंडळातल्या गणेश उत्सवातल्या नाटकाने केली होती! मराठमोळ्या चित्रपटात ओमीआपल्याला प्रमुख भूमिकेत दिसणार आहे 'आईच्या गावात मराठीत बोल' हा धम्माल विनोदी चित्रपटातून ओमी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी. १९ जानेवारी २०२४ रोजी चित्रपटगृहात आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे.
चित्रपटाचा नायक समर (ओमी वैद्य), अमेरिकेतून भारतात आल्यावर त्याचा प्रवास कसा असेल? वाक्यागणिक मराठी भाषेचा बदलणारा बाज, साता समुद्रापलीकडे वाढलेली मुलंगावाच्या गावरान मातीत कशी टिकतील? मराठमोळी संस्कृती गावची रहन सहन, गावचा गावरान तडका गावाकडच्या लोकांचं प्रेम, साधी कुटुंब पद्धती स्वतःची पाळंमुळं ह्याचा खरा अर्थही जसा समरला सापडतो तसाच त्याचा हा प्रवास प्रेक्षकांनाही भावेल.ओमी वैद्य पहिल्यांदाच मराठी चित्रपटात काम करत असल्याने रसिक प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.चित्रपटाची निर्मिती अहमद लुकान, डॉ. पुनीत चांडक, डॉ. सुमुल रावल, मार्थेश्वरन सोलामुथू, माईक कासिन, राजन वासुदेवन, संजय सहगल, शाहीन गांधी, स्टीव्हन मोरलँड, सुप्रतीम डे, उदय कुमार यांनी केली आहे.
आता फक्त हेच पाहायचं आहे की 'थ्री इडियट्स' मध्ये जसं ओमनी सर्वांचं मनोरंजन केलं आणि प्रेक्षकांची मन जिंकली तसंच आता तो पुन्हा एकदा मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवून जाणार,का ?ते आता लवकरच समजेल.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.