इमरान हाश्मी दिसणार या नव्या वेब सीरिज मध्ये

इट्स शोटाइम ! करण जोहरच्या बॉलिवूड मधल्या नव्या वेब सीरिज मध्ये दिसणार इमरान हाश्मी

EmraanHashminewwebseries

इमरान हाश्मी दिसणार या नव्या वेब सीरिज मध्ये

डिस्नी+हॉटस्टार आणि धार्मॅक्टिक एंटरटेनमेंटच्या नवीन वेब शो चा  पहिला ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून बॉलीवूड मधले अनेक चेहरे यात दिसणार आहेत. काहीतरी भन्नाट कथा , कलाकारांची मांदियाळी असलेल्या " इट्स शो टाईम " मध्ये बॉलिवुड चा ओजी अभिनेत्री इमरान हाश्मी झळकणार आहे. ट्रेलर मधल्या प्रत्येक फ्रेमला एक जादू देणारा त्याचा स्क्रीन प्रेझेन्स हा इमरान हाश्मी ची वेगळी बाजू दाखवत आहे. इमरान हाश्मी एका प्रभावशाली चित्रपट निर्मात्याच्या भूमिकेत दिसणार असल्याचं कळतंय.

नेटफ्लिक्सवरील बार्ड ऑफ ब्लडच्या यशानंतर आता इमरान इट्स शोटाइम मध्ये दिसणार आहे आणि म्हणून पुन्हा एकदा त्याच OTT वर पदार्पण होणार आहे. इमरान हाश्मीचा OTT वर हा दुसरा परफॉर्मन्स असणार आहे.या वेब शोमध्ये इमरान हाश्मीच पात्र हे वेगळं ठरणार असून नक्कीच तो खास दिसणार आहे. सुमित रॉय, शोरनर मिहिर देसाई यांनी तयार केलेल्या मिहिर देसाई आणि अर्चित कुमार दिग्दर्शित शोमध्ये इमरान हाश्मी, महिमा मकवाना, मौनी रॉय, नसीरुद्दीन शाह, राजीव खंडेलवाल आणि श्रिया सरन आहेत दिसणार आहेत

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story