परिणीती चोप्रा राजकारणात एन्ट्री करणार का? रंगली चर्चा
अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आप नेते राघव चड्ढा यांचा उदयपूर, राजस्थान येथे 24 सप्टेंबर रोजी मोठ्या थाटात विवाहसोहळा पार पडला. तेव्हापासून हे जोडपे सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून आनंदी विवाहित जीवनाची झलकदेत आहेत. नुकतीच परिणीती वडोदरा येथे एका कार्यक्रमात सहभागी झाली होती, जिथे दिलेल्या एका मुलाखतीत परिणीतीला विचारण्यात आले तुम्ही राजकारणात प्रवेश करणार का? त्या प्रश्नाला उत्तर देताना परिणिती चोप्रा म्हणाली, "आमच्या यशस्वी वैवाहिक जीवनाचे रहस्य मी तुम्हाला सांगते. राघवला बॉलीवूडबद्दल काहीच माहिती नाही आणि मला राजकारणाविषयी काहीही माहिती नाही! त्यामुळे, तुम्ही मला राजकारणात येताना पाहाल असे वाटत नाही. ...
आम्ही दोघंही सार्वजनिक जीवनात असलो तरी देशभरातून आम्हाला इतकं प्रेम मिळेल याची कल्पनाही नव्हती.मला असं वाटतं की तुम्ही योग्य व्यक्तीसोबत असाल तर वैवाहिक जीवन सर्वोत्तम आहे.तिच्या आयुष्याविषयी पुढे बोलताना,परिणीती म्हणाली, “जीवनाचा योग्य समतोल साधणे खूप महत्त्वाचे आहे. कामात व्यस्त असल्यामुळे वेळेवर जेवले नाही किंवा झोपले नाही, याबद्दल भारतात आपण अनेकदा अभिमानाने बोलतो. ते सन्मानाच्या बिल्लाप्रमाणे ते परिधान करतात परंतु वैयक्तिकरित्या, जीवन जगण्याचा हा योग्य मार्ग आहे असे मला वाटत नाही. मी खरोखर कठोर परिश्रम करण्यावर विश्वास ठेवते परंतु मला माझ्या मित्रांना भेटायला आणि सुट्टीवर जाणे देखील आवडते. जेव्हा मी 85 किंवा 90 वर्षांची असेल, तेव्हा मला मागे वळून पाहिलं पाहिजे आणि मला असं वाटलं पाहिजे की मी माझं आयुष्य मला जसं जगायला पाहिजे होतं तसंच जगले. असे विषयांतर करत परिणीतीला राजकारणात रस नसल्याचे तिने स्पष्ट सांगितले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.