'कारटेप' बंद करायला लावल्याने महिलांना मारहाण तिघा भावांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल

कारमध्ये मोठ्या आवाजात लावलेली गाणी बंद करायला सांगितल्याच्या रागामधून दोन महिलांना मारहाण करून त्यांचा विनयभंग करण्यात आल्याची घटना विमाननगर येथील निको गार्डनच्या पाठीमागे घडली.

womencrime

'कारटेप' बंद करायला लावल्याने महिलांना मारहाण तिघा भावांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल

पुणे : कारमध्ये मोठ्या आवाजात लावलेली गाणी बंद करायला सांगितल्याच्या रागामधून दोन महिलांना मारहाण करून त्यांचा विनयभंग करण्यात आल्याची घटना विमाननगर येथील निको गार्डनच्या पाठीमागे घडली. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आशुतोष विजय साबळे (वय २५), आदित्य विजय साबळे (वय २७), आशिष विजय साबळे (२३ सर्व रा. गंगापूरम सोसायटी, विमाननगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या भावांची नावे आहेत. यापक्ररणी एका ३० महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला आणि त्यांचे कुटुंबीय रविवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास घरामध्ये झोपलेले होते. त्यावेळी आरोपी तिघे भाऊ त्यांच्या मोटारीमधून (एमएच १२, एनजी ७७४७) आले. त्यांनी गाडी रस्त्यात लावून गाडीमध्ये जोरजोरात गाणी लावली. त्यांना फिर्यादी महिलेने हटकले. त्यांना आवाज बंद करण्यास सांगितले.

त्याचा राग आल्याने आरोपी भावांनी 'रस्ता काय तुमच्या बापाचा नाही.' असे म्हणत आक्रमक पवित्रा घेतला. फिर्यादी महिलेने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपींनी त्यांना हाताने मारहाण केली. त्यांचा ड्रेस गळ्याजवळ पकडून फाडला. त्यांचा विनयभंग केला. भांडणे सोडविण्यास आलेल्या त्यांच्या आईला देखील शिवीगाळ करीत हाताने व लाथाबूक्क्यांनी मारहाण केली. या झटापटीत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र पडून गहाळ झाले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest