मुक्ती मोहनने कुणाल ठाकूरसोबत बांधली लग्नगाठ!
शक्ती मोहन आणि नीती मोहन या तिच्या प्रतिभावान बहिणींच्या पावलावर पाऊल ठेवत मुक्तीने जरा नचके देखा 2, कॉमेडी सर्कस का जादू, झलक दिखला जा 6 आणि फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी 7 यासारख्या अनेक रिअॅलिटी टीव्ही शोमध्ये सहभागी झाले आहे.आत्ता तिचा नवीन प्रवास सुरू करण्यासाठी तीसज्ज आहे.
मुक्तीने तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या चाहत्यांसोबत लग्नाची झलक शेअर केली आहे. तिने पोस्ट लिहून कॅप्शन मध्ये असे लिहले आहे, "तुझ्यात, मला माझा दैवी संबंध सापडला आहे; तुझ्याबरोबर माझे मिलन निश्चित आहे. देव, कुटुंब आणि मित्रांनी दिलेल्या आशीर्वादाबद्दल मी कृतज्ञ आहे.माझे कुटुंबिय आनंदी आहेत आणि पती म्हणून आमच्या पुढच्या प्रवासासाठी आम्ही तुमचे आशीर्वाद घेत आहोत.
मुक्तीचा पती कुणाल ठाकूर हा एक अभिनेता आहे आणि तो अलीकडेच संदीप रेड्डी वंगा यांच्या ब्लॉकबस्टर पॅन-इंडिया चित्रपट अॅनिमलमध्ये दिसला होता. या अभिनेत्याने रश्मिका मंदान्नाच्या मंगेतराची भूमिका केली होती. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून जगभरात 600 कोटींहून अधिक कमाई केली आहे.मुक्ती व कुणालने तिच्या लग्नातील फोटो टाकल्यानंतर लगेचच, सेलिब्रिटींनी या जोडप्याचे अभिनंदन करण्यासाठी कंमेंट करून दोघांना त्यांच्या नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.