म्हणून टायगर श्रॉफ "रॅम्बो" साठी झाला कास्ट
अश्या भूमिका करून टायगर श्रॉफने आपल करिअर साकारल आहे. त्याच्या एकेरी भूमिका आणि अफलातून मोहित करणाऱ्या अॅक्शन स्टंट्सने प्रेक्षकांना पिढ्यानपिढ्या आकर्षित केले आहे आणि तो फार कमी वेळात अॅक्शन स्टारडम कडे वळला आहे.
मोठा अॅक्शन सुपरस्टार म्हणून त्याने आपल नाव कमावलं असून मार्शल आर्ट्स आणि पार्करमधील प्रशिक्षणासाठी अनेक वर्षांचे मेहनत करून त्याने प्रत्येक स्टंट केले. इंडस्ट्रीतील एका व्यक्तीने स्पष्ट केले, "टायगरने याने वेगळ्या भूमिका करत कठीण शैली निवडली आहे. तो खूप मेहनत घेऊन प्रशिक्षण घेतो आणि कठीण स्टंट्स सहज करून दाखवतो"
दिग्दर्शक आणि निर्माता सिद्धार्थ आनंदने रॅम्बोच्या हिंदीमध्ये रिमेक करण्याच ठरवलं तेव्हा त्यांनी टायगर श्रॉफला प्रकल्पातील पहिला अभिनेता म्हणून साइन केले हे आश्चर्यकारक नाही. चित्रपटाचे प्री-प्रॉडक्शन सुरू आहे आणि निर्माते पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला चित्रपटाचे रोलिंग सुरू करणार आहेत. एका चित्रपट व्यापार विश्लेषकाने खुलासा केला " टायगर ची निवड स्पष्ट आहे. तो जे करतो अस कोणी करू शकत नाही.त्याच्या पिढीतील अनेक कलाकार आता अॅक्शन चित्रपट करण्याचा प्रयत्न करत असले तरीही त्याची मेहनत उल्लेखनीय आहे" सध्या टायगर स्वत: वर काम करत असून त्याच्या अॅक्शन चित्रपटांच्या शैली साठी तयारी करत आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.