तिसऱ्यांदा पियुष रानडेने बांधली लग्नगाठ...सुरुची अडारकरसोबत सप्तपदी
‘का रे दुरावा’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुरुची अडारकर अभिनेता पियुष रानडे सोबत थाटणार संसार.सुरुची अडारकरने नुकतीच इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. पेहचान या मालिकेतुन सुरुचीने सिनेसृष्टीत पदार्पण केले.त्यानंतर तिने ‘अवघाची संसार’, ‘ओळख’, ‘एक तास भुताचा’, ‘आपलं बुवा असं आहे’ या मालिकांमध्ये काम केले. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘का रे दुरावा’ या मालिकेमुळे तिला खरी ओळख मिळाली. त्यानंतर सुरुची ही ‘अंजली झेप स्वप्नांची’ या मालिकेत झळकली. सध्या ती ‘छोट्या बयोची मोठी स्वप्न’ या मालिकेत पाहायला मिळत आहे.
पियुष रानडे हा देखील प्रसिद्ध अभिनेता आहे. पियुष हा सध्या ‘काव्यांजली’ या मालिकेत विश्वजीतच्या भूमिकेत दिसत आहे. याआधी तो ‘अंजली झेप स्वप्नांची’ या मालिकेत झळकला. पियुष रानडेचे हे तिसरे लग्न आहे. याआधी तो अभिनेत्री शाल्मली टोळ्ये आणि मयुरी वाघ यांच्याशी लग्नबंधनात अडकला होता. मात्र, लग्नाच्या काही वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला.दोघांच्या लग्नाच्या फोटोवर अनेक कलाकार शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत.नववधूच्या रुपात दोघेही अतिशय सुंदर दिसत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.