'या' कारणामुळे दिसल्या नाहीत, किशोरी शहाणे मराठी सिनेसृष्टीत
प्रेक्षकांची आवडती मराठी कलाकार म्हणजेच किशोरी शहाणे हे मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेल्या कलाकारानं पैकी एक आहेत.आता पुन्हा एकदा त्या नव्या मालिकेमध्ये वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आल्या आहेत. नुकत्याच सुरू झालेल्या 'कैसे मुझे तुम मिल गये' या मालिकेत त्या नायकाच्या आईची व्यक्तिरेखा साकारणार आहेत.गेल्या काही वर्षांत मराठीच्या तुलनेत हिंदी कलाकृतींमध्ये त्या जास्त दिसल्या नाहीत. याबाबत त्या म्हणाल्या, 'ज्यावेळी माझ्याकडे पुरेसा वेळ असतो त्यावेळी मी मराठी कलाकृतीची आतुरतेनं वाट बघत असते. परंतु आजवर अनेकदा असंच झालंय की, इतर कलाकृतींना होकार दिल्यानंतर मराठी प्रोजेक्ट्सबद्दल विचारणा झालीय; पण तेव्हा वेळेअभावी ते करणं शक्य झालेलं नाही. पण लवकरच मी एका मराठी कलाकृतीमधून दिसणार आहे हे नक्की.' किशोरी वेगवेगळ्या कलाकृतींच्या माध्यमातून नवनवीन तरुण कलाकारांसोबत काम करताना दिसतात.‘नव्या पिढीच्या सादरीकरणात सहजता असते. त्यांची निरीक्षण क्षमता वाढीस लागली तर नक्कीच त्याचा नव्या पिढीला फायदा होईल.' असा त्यांनी अनुभव सांगितला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.