केतकी माटेगावकर
सोशल मीडिया वरती कलाकारांना ट्रोल केलं जाणं हे सध्या सुरू आहे.अश्यातच मराठी सिनेसृष्टीतली गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावकरला बॉडी शेमिंगला सामोरं जावं लागलं.केतकीच्या फोटो आणि व्हिडिओंच्या खाली कमेंट करत तिला बॉडी शेम करण्यात येत आहे. सतत तिच्या पोस्टखाली तिच्या वजनावरून कमेंट करत तिला ट्रोल केलं जात आहे. यावर कधीही न बोलणारी केतकी आता मात्र व्यक्त झाली आहे. सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट करत ट्रोल करणाऱ्यांना आणि बॉडी शेम करणाऱ्यांना तिनं चांगलंच सुनावलं आहे.
काय लिहल आहे केतकीन इंस्टाग्राम पोस्टमध्ये?
शरीर आपल्याला देवाने दिलेली देणगी आहे. मी तुमच्या भाषेत स्कीनी, हाडांचा सापळा, बारीक आहे. हो आहे आणि तरी सुद्धा मला त्याचा अभिमान आहे. माझे वडील, माझे आजोबा सगळे बारीक , तशी मी सुद्धा बारीक. तरीही अजिबात न थकता १७-१८ तास शूट करताना हेच माझं शरीर माझी उत्तम साथ देतं. असं केतकीनं म्हटलंय. तर वजनावरून ट्रोल करणाऱ्यांची तिनं शाळा घेतली आहे.
थोडं वजन वाढवायला हवं का ? तर हो असेल ! पण म्हणून unhealthy आहे का ? तर अजिबात नाही !
व्यायाम किंवा gym हा फक्त वजन कमी करायला करतात असा विचार करणारे अजिबात व्यायाम करत नसावेत. काळजीने म्हणणं ठीके.
पण अत्यंत हीन दर्जाच्या भाषेत comment करणं, एका मुलीच्या शरीरावर, तिच्या body parts वर openly comment करणं. ह्याला तुम्ही "स्वातंत्र्य " आणि Free Speech असं नाव देता.
आम्ही कलाकार सुद्धा माणसं आहोत. We cut and we bleed just like others. We do get hurt too.
तुम्हाला सुद्धा घरात बहिणी असतील आई असेल. ह्याचा विचार करा.
आणि काही लोकं असे ही असतील ज्यांना खरंच medical problem असेल ज्यामुळे त्यांचं वजन कमी होत नसेल किंवा वाढत नसेल,
imagine what kind of a horrible mental state you are putting them in!
Be a little kind and loving. Have some empathy and compassion!
मी नेहमीच एक कलाकार म्हणून आणि व्यक्ती म्हणूनही जास्तीत जास्त चांगल होत जाण्याचा प्रयत्न करतेय! आणि माझ्या गाण्यातून, कलेतूनतुम्हाला प्रेम देण्याचा आणि मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत राहीन !
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.