अॅनिमल ठरला ब्रेक आउट सिनेमा सलोनी बत्रासाठी !
संदीप रेड्डी वंगा यांचे दिग्दर्शन आणि रणबीर कपूर स्टारर अॅक्शन क्राईम थ्रिलर चित्रपट 'अॅनिमल' हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, बॉबी देओल, अनिल कपूर, रश्मिका मंदान्ना, सुरेश ओबेरॉय आणि सलोनी बत्रा यांच्यासह अनेक कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
Animal ची बहुतेक स्टार कास्ट खूप प्रसिद्ध आहे पण चित्रपटात रणबीरच्या बहिणीची भूमिका करणारी सलोनी बद्दल तुम्हाला कदाचितच माहिती असेल. 'अॅनिमल'मध्ये रणबीर कपूरच्या बहिणीची भूमिका साकारणारी सलोनी बत्राहिने सलोनी ने रणबीर कपूरच्या बहिणीची भूमिका अगदी सहजतेने आणि भावनिक नात जपून साकारली आणि म्हणून ती प्रेक्षकांना मोहित करून गेली.
बॉलीवूडच्या रंगतदार स्पर्धेत टिकून राहणं आव्हानातमक असताना सलोनी बत्रा तिच्या ब्रेकआउट परफॉर्मन्सने ती यंदाची ब्रेकआउट अभिनेत्री ठरली आहे. " अॅनिमल" मधील तिच्या उत्कृष्ट भूमिकेने प्रेक्षकांना मोहित केलं आणि पुन्हा एकदा ती स्पॉटलाइटमध्ये आली. सलोनी बत्राच्या कलाकारी कारकिर्दीत तिने आजवर उत्तम काम केलं आहे. तिने प्रत्येक भूमिकेसाठी खूप कष्ट केले प्रत्येक भूमिका उत्तम साकारली मग ती TAISH मधील असो किंवा SONI मधील तिच्या "अॅनिमल" मधली भूमिका यशस्वी ठरली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.