धर्माचा आदर अन,प्रेमाचा त्याग असीम आणि हिमांशीचा ब्रेकअप!
अभिनेत्रीने एक सोशल मेडिया वरती एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना हि माहिती दिली आहे, ज्यामध्ये ते दोघे आता एकत्र नाहीत असे सांगितले आहे.
यात हिमांशीने लिहिले की, 'होय, असीम आणि मी आता एकत्र नाही. आम्ही एकत्र घालवलेले काही क्षण खूप खास आणि सुंदर आहेत. पण आमचा सहवास आता इथेच संपला आहे. आमच्या सुंदर नात्याचा प्रवास खूप छान होता, पण आता आम्ही आपापल्या जीवनात पुढे जात आहोत. आपापल्या धर्माचा आदर करताना, आपल्या वेगवेगळ्या धार्मिक श्रद्धांसाठी आम्ही प्रेमाचा त्याग करत आहोत. आम्ही एकमेकांच्या विरोधात नाही.आम्ही तुम्हाला आमच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती करतो. या जोडीचे लाखो चाहते होते. या पोस्ट मुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तीन वर्षांहून अधिक काळ एकमेकांना डेट केलेले हे जोडपे शोमध्ये खूप चर्चेत होते. शोमध्ये असताना असीमने वाइल्डकार्ड स्पर्धक बनून हिमांशीला गुडघ्यावर बसून प्रपोज केलेला होता. हिमांशीने असीमसाठी आपले लग्नही मोडले होते.
याशिवाय हिमांशी खुरानाने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे . त्यात तिने लिहिले की, 'आम्ही प्रयत्न केला पण आम्हाला आमच्या आयुष्यावर उपाय सापडला नाही. आम्ही अजूनही एकमेकांवर प्रेम करतो पण आमचे नशीब आमच्या पाठीशी नाही. आमच्यात द्वेष नाही, फक्त प्रेम आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.