ज्युनियर मेहमूद यांचे जवळचे मित्र सलाम काझी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून ज्युनियर मेहमूद यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान अभिनेते मेहमूद यांनी त्यांचे जुने मित्र, ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र आणि सचिन पिळगावकर यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर सचिन पिळगावकर आणि जितेंद्र हे ज्युनियर मेहमूद यांना भेटायला रुग्णालयात पोहोचले होते.
सलाम काझी आणि ज्युनिअर मेहमूद यांची गेल्या १५ वर्षांपासून घट्ट मैत्री होती. काही दिवसांपुर्वी ज्युनियर मेहमूद यांच्या तब्येतीची माहिती देत असताना सलाम काझी म्हणाले होते की,'ज्युनियर मेहमूद गेल्या २ महिन्यांपासून आजारी होते. जेव्हा ज्युनियर मेहमूद यांचा मेडिकल रिपोर्ट आला, तेव्हा त्यांना यकृत आणि फुफ्फुसात कर्करोग, आतड्यात गाठ आणि कावीळही झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते, पण डॉक्टरांनी हा कॅन्सर चौथ्या स्टेजचा असल्याचे आधीच सांगितले होते. कॅन्सर एक महिन्यापूर्वीच कळला असला, तरी तो स्टेज फोरमध्ये होता. डॉक्टरांनी त्यांच्याकडे आता अवघे ४० दिवसांचेच आयुष्य असल्याचे म्हटले होते.'
ज्युनियर मेहमूद हे असे बालकलाकार होते ज्यांच्याकडे ७० च्या दशकात इंपोर्टेड कार होती. त्यावेळी मुंबईत फक्त १२ इंपोर्टेड गाड्या होत्या. त्यातील एक ज्युनियर मेहमूद होते. अवघ्या लहान वयातच त्यांनी घवघवीत यश संपादन केले होता पुढे त्यांनी करावा,हाथी मेरे साथी,मेरा नाम जोकर या चित्रपटातुन ठसा उमठवला. ५ रुपये फीपासून सुरू झालेल चित्रपटसृष्टीतील आयुष्य करिअरच्या शिखरावर असताना ते लाखो रुपये चित्रपटासाठी घेत होते. मध्यंतरी ते सोनीच्या टीव्हीच्या 'एक रिश्ता शामंदी का'मध्ये मन्सूर हे पात्र साकारत होते. बालकलाकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कलाकाराची प्राणजोत मालवली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.