असा तयार झाला बलबीर सिंग !
ब्लॉकबस्टर संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित अॅनिमलमध्ये अभिनेता अनिल कपूरच्या बलबीर सिंग ची भूमिका भाव खाऊन गेली आणि या बद्दल अनिल कपूर यांचं कौतुक देखील झालं. ही भूमिका सुपरहिट तर ठरली पण अनिल कपूर यांनी या भूमिकेसाठी खूप ट्रेनिंग घेतलं आणि याच भूमिके मागची खास गोष्ट त्यांनी त्यांचा सोशल मीडिया व्हिडिओ मधून दाखवली आहे.
चित्रपटातील पडद्यामागील ही गंमत आणि अनिल यांची अपार मेहनत या व्हिडिओ मधून बघायला मिळतेय. अनिल कपूर यांना या भूमिकेसाठी विशेष कष्ट करावे लागले असून त्यांनी व्हिडिओमध्ये संपूर्ण चेहऱ्याचा मुखवटा कसा घातला याची गोष्ट उघड केली आहे. 40 वर्षांपासून विविध चित्रपटांमध्ये अनिल कपूर यांच्या वेगवेगळ्या भूमिका साकारल्या हा मेगास्टार आता त्याच्या शिस्तबद्ध आणि त्याने निवडलेल्या प्रत्येक पात्रासाठी पद्धतशीर दृष्टिकोनासाठी ओळखला जातो आणि यावेळीही दुहेरी भूमिकेच्या तयारीचा भाग म्हणून त्याने प्रोस्थेटिक्सचा चा वापर केला.
भूमिका आणि त्यासाठीची मेहनत अनिल कपूर यांनी घेऊन या भूमिकेला न्याय देऊन पुन्हा एकदा आपली कलाकारी सिद्ध केली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.