'चमकीला' चित्रपटासाठी परिणीतीने तब्बल 15 किलो वजन वाढवले

परिणीतीचा 'चमकीला' हा आगामी चित्रपट आपल्या भेटीला येतोय.' चमकीला' चित्रपटासाठी परिणीतीने तब्बल 15 किलो वजन वाढवले आहे.

'चमकीला' चित्रपटासाठी परिणीतीने तब्बल 15 किलो वजन वाढवले

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. मग ते तिच्या स्कुबा ड्रायव्हिंगसाठी असोत, गाण्यासाठी असो किंवा तिच्या फिटनेस जर्नीसाठी, काही दिवसांपूर्वीच आप नेता राघव चड्डा याच्यासोबत परिणीती लग्न बंधनात अडकली हा विवाह सोहळा राजस्थान येथे दिमाख्यात पार पडला.या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले.लग्नानंतर नव्या कुटुंबियांसोबत खास वेळ घालवताना परिणीती आपल्याला दिसली. आता परिणीती चोप्रा ही परत एकदा आपल्या कामावर परतल्याचे बघायला मिळतंय, परिणीतीने तीच्या इंस्टाग्राम वर एक खास व्हिडीओ शेअर केला. परिणीतीने शेअर केलेला हा व्हिडिओ तिच्या जिम मधील वर्कआउट करतानाचा आहे. परिणीतीचा 'चमकीला' हा आगामी चित्रपट आपल्या भेटीला येतोय.' चमकीला' चित्रपटासाठी परिमितीने तब्बल 15 किलो वजन वाढवले आहे.या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये परिणीती म्हणतीये.

संगीत आणि खाणे माझे रूटीन झाले. आता चित्रपट तयार झालाय... मला स्टुडिओची आठवण येतंय. परिणीती हिने बरीच मोठी पोस्ट लिहिल्याचे बघायला मिळतंय. आता वजन कमी करण्यासाठी चांगलीच मेहनत घेताना परिणीती दिसत आहे.

चमकीला चित्रपटाकडून परिणीतीसह निर्मात्यांनाही मोठ्या अपेक्षा नक्कीच आहेत.कारण काही दिवसांपूर्वीच परिणीतीचा मिशन रानीगंज हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाने अजिबातच धमाका केला नाही.अक्षय कुमार आणि परिणीती चोप्रा हे मिशन रानीगंज या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत होते.

परिणीतीने शेअर केलेला हा व्हिडीओ तिच्या चाहत्यांना जबरदस्त आवडलेला दिसत आहे. चाहते परिमितीच्या पोस्ट वरती लाईक  आणि कमेंटचा मोठा वर्षाव करत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story