मॅडी या गोष्टीमुळे ठरतोय मल्टी हायफेनेट !

मॅडीने एक अभिनेता म्हणून आणि आता एक प्रतिष्ठित चित्रपट निर्माता म्हणून खूप लांब पल्ला गाठला आहे. संपूर्ण चित्रपट कारकिर्दीत तो भारतीय चित्रपट उद्योगात एक ट्रेलब्लेझर व्यक्ती ठरला आहे.

Maddyismulti-hyphenate

मॅडी या गोष्टीमुळे ठरतोय मल्टी हायफेनेट !

आर. माधवन हा अभिनेता भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक अनोखं व्यक्तिमत्व आहे. वैविध्यपूर्ण कथा आणि दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता म्हणून दिग्दर्शनात पदार्पण करून त्यांनी त्यांच्या उत्कृष्ट रचना रॉकेट्री: द नंबी इफेक्ट मधून प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले. या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा सर्वात प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार जिंकला आहे. तीन भाषांमध्ये बनवलेल्या चित्रपटाचा हा गौरव आहे. 

माधवन हा नेहमीच ट्रेंडसेटर आणि युथ आयकॉन ठरला आहे. त्याच्या क्षेत्रात तो कायम अग्रगण्य ठरला. रॉकेट्री मधल त्याच वेगळंपण हे अनोखं ठरलं आणि जागतिक स्तरावर कोणीही न कमावलेलं नाव कमावलं. सध्या "द रेल्वे मेन" या वेब सिरीजमधील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल तो प्रशंसा मिळवत आहे. मॅडीने एक अभिनेता म्हणून आणि आता एक प्रतिष्ठित चित्रपट निर्माता म्हणून खूप लांब पल्ला गाठला आहे. संपूर्ण चित्रपट कारकिर्दीत तो भारतीय चित्रपट उद्योगात एक ट्रेलब्लेझर व्यक्ती ठरला आहे.

जोगिंदर टुटेजा: माधवन बद्दल बोलताना म्हणाले "आर. माधवनने ज्या प्रकारे पुढे जाऊन 'द रेल्वे मेन' मध्ये काम केले आहे ते पाहणे खरोखर खूप आनंददायी आहे. तो सुमारे अडीच दशके काम करत असल्यामुळे त्याच्या अष्टपैलुत्वाची ओळख प्रत्येक प्रोजेक्ट मधून दिसून येते. ज्या प्रकारे तो अजूनही चित्रपट साइन करत आहे आणि OTT शो मध्ये आपल्या कामाची जादू दाखवत आहे हे बघण उत्सुकतेच आहे. मला त्याला दरवर्षी आणखी हिंदी प्रोजेक्ट्स (चित्रपट/OTT) मध्ये बघायचे आहे."

रॉकेट्री: द नंबी इफेक्टस हा चित्रपट एरोस्पेस अभियंता नंबी नारायणन यांच्या जीवनावर आणि काळावर आधारित आहे.त्याने केवळ एक उत्कृष्ट नमुनाच तयार केला नाही तर चित्रपट निर्माते म्हणून इतिहासात आपले नाव कोरले आहे ज्याने सिनेमॅटिक लँडस्केपची नवी व्याख्या तयार केली आहे. स्वप्ने पाहण्याची आणि पुन्हा परिभाषित करण्याची हिंमत त्याने यातून केली आहे. माधवनने शशिकांतच्या क्रिकेट ड्रामा टेस्ट आणि विकास बहल दिग्दर्शित अजय देवगण सोबत शीर्षक नसलेल्या चित्रपटातील भूमिकांसह सिनेमॅटिक अनुभव देणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story